गोपीनाथ मुंडे स्मृतिदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:39 IST2021-06-09T04:39:03+5:302021-06-09T04:39:03+5:30

७ आरोग्य केंद्रांसाठी १३ पोलीस मित्र खेड : खेड तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कोरोना रुग्णांच्या संपर्क ...

Gopinath Munde Memorial Day | गोपीनाथ मुंडे स्मृतिदिन

गोपीनाथ मुंडे स्मृतिदिन

७ आरोग्य केंद्रांसाठी १३ पोलीस मित्र

खेड :

खेड तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कोरोना रुग्णांच्या संपर्क ट्रेसिंग मोहिमेसाठी तालुक्यातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या व नगर परिषद दवाखान्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीला १३ पोलीस मित्रांची नियुक्ती करण्यात आली आहे.

श्वानाची दहशत

दापोली : तालुक्यातील मुरूड येथे पिसाळलेल्या श्वानाची दहशत निर्माण झाली आहे. या श्वानाने दोन मुलांच्या हाताला व पायाला चावा घेतला आहे. यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पीक स्पर्धेचे नियोजन

चिपळूण : पिकांची उत्पादकता वाढविण्याबरोबरच प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन मिळावे तसेच त्यांनी अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करावा, या उद्देशाने पीक स्पर्धेचे नियोजन केले आहे. खरीप पिकांसाठी ३१ ऑगस्टपूर्वी कृषीच्या संकेतस्थळावर अर्ज करायो आहेत.

Web Title: Gopinath Munde Memorial Day