कुसुमताई सहकारी पतसंस्थेच्या ठेव वृध्दी माससाठी चांगला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:22 IST2021-07-10T04:22:29+5:302021-07-10T04:22:29+5:30
रत्नागिरी : कुसुमताई सहकारी पतसंस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दि. १ जुलै ते दि. १ ऑगस्ट असा ठेव वृध्दी मास जाहीर ...

कुसुमताई सहकारी पतसंस्थेच्या ठेव वृध्दी माससाठी चांगला प्रतिसाद
रत्नागिरी : कुसुमताई सहकारी पतसंस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दि. १ जुलै ते दि. १ ऑगस्ट असा ठेव वृध्दी मास जाहीर केला असून, आकर्षक व्याजदर जाहीर केले आहेत. या जादा व्याजदराचा फायदा ठेवीदारांना होत असून, ग्राहकांचा त्यासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे.
ठेव वृध्दी मासामध्ये २ कोटींच्या ठेवी संकलित करण्याचा संकल्प संचालक मंडळाने केला आहे. एक वर्षासाठी आठ टक्के व्याजदर व ३ वर्षांसाठी ७.२५ टक्के (मासिक व त्रैमासिक व्याज) तसेच तीन वर्षांसाठी सात टक्के (पुनर्गुंतवणूक) व्याजदर ठेवीदारांना मिळणार आहे. संस्थेने यापूर्वी जाहीर केलेल्या ठेव वृध्दी मासाला ठेवीदारांनी चांगला प्रतिसाद दिला असून, संस्थेकडे २५ कोटींच्या ठेवी आजपर्यंत जमा झाल्या आहेत. गतवर्षी कोरोनाच्या कठीण काळातही वर्षभरात ४ कोटींच्या ठेवी जमा झाल्या. या ठेव वृध्दी मासातही २ कोटींचे उद्दिष्ट पूर्ण होईल, असा विश्वास संचालकांना असून, त्यादृष्टीने सर्व संचालक, कर्मचारी, पिग्मी एजंट नियोजन करत आहेत.
सर्वत्र सोनेतारण कर्जाची वाढती मागणी लक्षात घेता गुंतवलेल्या ठेवीचे योग्य नियोजन संस्था स्तरावरून करण्यात येत आहे. नव्याने सुरू झालेल्या सर्व शाखांबरोबरच शृंगारतळी शाखेत सोनेतारण कर्जाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. संस्थेमध्ये सोनेतारण कर्जासह जामीनतारण कर्ज सुविधा उपलब्ध आहे. संस्थेमध्ये रोज पाच लाखांची पिग्मी जमा होत असून, आरडी व बचत योजनेच्या माध्यमातून ठेवी जमा होत आहेत. संस्थेवरील ठेवीदारांचा विश्वास यामुळे अधिक दृढ होत आहे.
संस्थेचे एकूण भाग भांडवल ५७ लाख ७७ हजार, ठेवी २५ कोटी, कर्ज २० कोटी ९ लाख असून, वसुली ९७ टक्के आहे. ठेवीदारांनी आपल्या ठेवी संस्थेमध्ये गुंतवाव्यात, असे आवाहन अध्यक्ष प्रा. नाना शिंदे व उपाध्यक्ष सतीश शेवडे व संचालक मंडळाने केले आहे.