अभियानाला चांगला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:33 IST2021-05-11T04:33:41+5:302021-05-11T04:33:41+5:30
रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच जिल्हा प्रशासनाकडून ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ मोहीम हाती घेण्यात आली आहे. या ...

अभियानाला चांगला प्रतिसाद
रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच जिल्हा प्रशासनाकडून ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून नागरिकांचे ऑक्सिजन, तापमान तपासणी केली जात आहे. त्याला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
नागरिकांची रस्त्यांवर गर्दी
रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने शासनाकडून लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्याला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळणे अवश्यक आहे. मात्र, मारुती मंदिर सर्कल परिसरानंतर शिवाजीनगर, आरोग्य मंदिर परिसरामध्ये लोकांची गर्दी असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
पावसाळ्यापूर्वी कामे करा
राजापूर : राजापूर शहर भागातील मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम चालू आहे. या कामामुळे बाधित होणारे मंदिर, गणेशघाट तसेच पोचरस्त्याची कामे योग्य रीतीने पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, अशी मागणी नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे यांनी केली आहे.
रस्त्याच्या कामाचा दर्जा निकृष्ट
राजापूर : तालुक्यातील धाऊलवल्ली गावात सुरू असलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कोट्यवधी रुपयांच्या रस्त्याचे काम निकृष्ट पद्धतीने सुरू असल्याचा आरोप या भागातील जयेंद्र कोठारकर यांनी केला आहे. काँक्रीटऐवजी मातीचा भराव टाकून मोरी बांधण्यात येत आहे.
कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी
खेड : तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील रुग्णांना लॉकडाऊन कालावधीत उपचारांसाठी अन्यत्र जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो. त्यासाठी कोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद सदस्या नफिसा परकार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
प्रशासकीय अधिकाऱ्यांची पाठ
गुहागर : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामात जागेच्या प्रश्नांकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याने अनेक ठिकाणी महामार्गाचे काम बारगळणार आहे. तर चिखलीपासून काळजीपर्यंतच्या मार्गावरील दोन पुलांचा आराखड्यात समावेश नसल्याने येथील काम बारगळणार आहे.
लसीकरण जोरात
दापोली : लसीकरणामध्ये दापोली शहर जिल्ह्यात दुसऱ्या स्थानावर आहे. दापोली उपजिल्हा रुग्णालयात आतापर्यंत ५,२७४ जणांनी लस घेतल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश भागवत यांनी दिली. उपजिल्हा रुग्णालयातील ५ नर्स व एका वॉर्डबॉयला कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, या सर्वांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.