शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कोकण बोर्ड एक नंबरलाच राहण्यासाठी सांघिकपणाने काम करु : उदय सामंत

By मनोज मुळ्ये | Updated: October 14, 2024 13:27 IST

रत्नागिरी : रत्नागिरीत सर्वात चांगले ज्ञानदान होत आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. कोकण बोर्ड सतत राज्यात पहिले राहिले ...

रत्नागिरी : रत्नागिरीत सर्वात चांगले ज्ञानदान होत आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. कोकण बोर्ड सतत राज्यात पहिले राहिले आहे. ते एक नंबरलाच राहिले पाहिजे, यासाठी सांघिकपणाने काम करु, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिली.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोकण विभागीय मंडळाच्या नियोजित प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन मंत्री सामंत यांनी कुदळ मारुन आणि दीपप्रज्वलन करुन आज केले. यावेळी शालेय शिक्षण तथा मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार तथा राज्य मंडळाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य विक्रम काळे, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे हे दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, सचिव अनुराधा ओक, विभागीय सचिव सुभाष चौगुले, कोकण विभागीय मंडळाचे अध्यक्ष महेश चोथे, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. एम. कासार उपस्थित होते.मंत्री सामंत पुढे म्हणाले की, २०१२ मधील कोकण बोर्डाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आहे. तेव्हापासून मेहनतीने आणि ताकदीने राज्यात पहिल्या क्रमांकावर कोकण बोर्ड राहिले आहे. त्यासाठी शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांना मनापासून धन्यवाद देतो. २४ कोटी रुपयांमधून राज्यातील सर्वात देखणी इमारत वर्ष दीड वर्षात उभी राहील, असे ते म्हणाले.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देऊन मंत्री सामंत म्हणाले की, ज्यांनी ज्यांनी मराठी शिकविली, ज्यांनी ज्यांनी मराठी सुदृढ केली, त्या शिक्षकांना आणि साहित्यिकांना याचे श्रेय जाते. नव्या प्रशासकीय इमारतीमधून दरवर्षी ५० हजार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे ही इमारत नसून, मंदिर आहे, असे ही ते म्हणाले.शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले की, कोकण बोर्डाची कामगिरी अतिशय चांगली राहिली आहे. खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या कारकीर्दीत कोकण बोर्डाची स्थापना झाली आहे. आमदार विक्रम काळे, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे या सर्वांचे कोकणावर विशेष लक्ष असते. त्यामुळे आमचे विद्यार्थी बोर्डाला नेहमीच राज्यात अव्वल ठेवतात. त्याबद्दल विद्यार्थी, पालकांचे अभिनंदन करतो, असे ते म्हणाले. यावेळी आमदार म्हात्रे आणि आमदार काळे यांनीही शुभेच्छा दिल्या. राज्य मंडळाचे अध्यक्ष गोसावी यांनी सर्वांचे आभार मानले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत