सृष्टी जाधवला योगासन स्पर्धेत सुवर्ण पदक
By Admin | Updated: July 19, 2016 21:22 IST2016-07-19T21:22:25+5:302016-07-19T21:22:25+5:30
जाधव हिने १४ ते १७ वर्षांखालील मुलींच्या गटात प्रथम क्रमांक पटकावून गोल्ड मेडल मिळवले.
सृष्टी जाधवला योगासन स्पर्धेत सुवर्ण पदक
चिपळूण : बृहन्मुंबई महानगर पालिका पुरस्कृत असोसिएशन आॅफ मुंबई योगा डिस्ट्रिक्ट आयोजित ‘मुंबई महापौर चषक योगासन स्पर्धा २०१६’मध्ये सृष्टी मनोज जाधव हिने १४ ते १७ वर्षांखालील मुलींच्या गटात प्रथम क्रमांक पटकावून गोल्ड मेडल मिळवले.
सृष्टी जाधव ही रत्नागिरी एज्युकेशन संस्थेची विद्यार्थिनी असून, आतापर्यंत राज्यस्तरापर्यंत तिने योगासनामध्ये यश मिळविले आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या महापौर चषक योगासन स्पर्धेत तिने प्रथम क्रमांक पटकवला. त्यामुळे तिला प्राविण्य प्रमाणपत्र व गोल्ड मेडल देऊन महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते गौरवण्यात आले. तिच्या यशाबद्दल चिपळूणच्या सभापती स्नेहा मेस्त्री, नगराध्यक्षा सावित्री होमकळस, संत गाडगेबाबा परिट समाज संस्थेचे जिल्हाध्यक्ष दीपक कदम, कार्याध्यक्ष सुभाष कदम, सल्लागार संतोष कदम, तालुकाध्यक्ष स्वप्नील शिंदे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, माजी सरपंच दशरथ दाभोळकर, माजी सरपंच प्रशांत यादव, माजी सरपंच नितीन ठसाळे, माजी सरपंच सुनील मेस्त्री, अनिल मेस्त्री आदींनी तिचे अभिनंदन केले आहे. (प्रतिनिधी)