रत्नागिरी दक्षिण झोनमध्ये गोगटे जाेगळेकर महाविद्यालय चॅम्पियन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:32 IST2021-03-27T04:32:04+5:302021-03-27T04:32:04+5:30

रत्नागिरी : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी मुंबई विद्यापीठाने ५३ वा युवा महोत्सव-२०२१ चे ऑनलाईन आयाेजन केले हाेते. या स्पर्धेत रत्नागिरीतील ...

Gogte Jaegalekar College Champion in Ratnagiri South Zone | रत्नागिरी दक्षिण झोनमध्ये गोगटे जाेगळेकर महाविद्यालय चॅम्पियन

रत्नागिरी दक्षिण झोनमध्ये गोगटे जाेगळेकर महाविद्यालय चॅम्पियन

रत्नागिरी : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी मुंबई विद्यापीठाने ५३ वा युवा महोत्सव-२०२१ चे ऑनलाईन आयाेजन केले हाेते. या स्पर्धेत रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालय झोनल राऊंडमध्ये १० स्पर्धांपैकी ८ स्पर्धांमध्ये पारितोषिक पटकावत चॅम्पियन ठरले आहे.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला प्राप्त झालेल्या पारितोषिकांमध्ये प्रथम क्रमांक

शास्त्रीय गीतगायन स्पर्धा - वैष्णवी जोशी, सुगम संगीत- वैष्णवी जोशी,

वेस्टर्न गीतगायन स्पर्धा- सम्यक हातखंबकर, मिमिक्री- शैलेश इंगळे,

एकपात्री- शुभम गोविलकर. वक्तृत्व स्पर्धेत सीमा दसाणा हिने द्वितीय क्रमांक पटकावला. त्याचबराेबर ऑन स्पॉट पेंटिंग- ओमकार कांबळे, कथाकथन- पर्णिका तिवरेकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. आनंद आंबेकर यांच्यासोबत प्रा. शुभम पांचाळ, प्रा. मधुरा आठवले- दाते, प्रा. जयंत अभ्यंकर, प्रा. आरती पोटफोडे, प्रा. अजिंक्य पिलणकर तसेच विद्यार्थी सचिव बुशरा खान व सांस्कृतिक विभाग विद्यार्थी प्रतिनिधी प्रसाद साळवी, शुभम शिवलकर, पर्णिका सुर्वे, कौस्तुभ आंब्रे, स्वप्निल शिंदे, सिद्धी गुरव यांनी महाेत्सवाचे व्यवस्थापन केले हाेते. तसेच सिद्धी शिंदे, शुभम नंदानी, चैतन्य पटवर्धन, केदार लिंगायत, स्वानंद नेनेे यांनी परिश्रम घेतले.

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी यशस्वितांचे स्वागत केले. स्पर्धेसाठी सहसमन्वयक प्रा. राहुल कोतवडेकर यांचे सहकार्य लाभले. तसेच मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील आणि सांस्कृतिक समन्वयक नीलेश सावे यांचे मार्गदर्शन लाभले.

चाैकट

इतर महाविद्यालयांचे पॉईंटस

गोगटे जोगळेकर कॉलेज - १८

आठल्ये सप्रे पित्रे कॉलेज - ११

आर्टस्, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज लांजा - ८

दि कॅड कॉलेज - ५

नवनिर्माण कॉलेज - ४

चाफे कॉलेज - ३

भारत शिक्षण मंडळ कॉलेज - ३

फिनोलेक्स कॉलेज - १

आबासाहेब मराठे कॉलेज - १

Web Title: Gogte Jaegalekar College Champion in Ratnagiri South Zone