राजीवड्यातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:29 IST2021-09-13T04:29:50+5:302021-09-13T04:29:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : रत्नागिरी शहराच्या हद्दीतील राजीवडा गावातील रहिवाशांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात यावे, अशी ...

राजीवड्यातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : रत्नागिरी शहराच्या हद्दीतील राजीवडा गावातील रहिवाशांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी जमातुल मुस्लिमीन राजीवडा कोअर कमिटीने नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राजीवडा गावातील बहुतांश रहिवाशांचे अजूनही लसीकरण झालेले नाही. दि. २ जून आणि २२ जून, २०२१ या दिवसांमध्ये लसीकरण शिबिर रत्नागिरी नगर परिषद उर्दू शाळा क्रमांक १८, राजीवडा येथे घेण्यात आले होते. त्यावेळी लसीकरणाचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना लस घेऊन ८४ दिवस उलटले आहेत. त्यांना दुसरा डोस मिळणे गरजेचे आहे. राजीवडा गाव कोरोनाच्या प्रादुर्भावात जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांनी दत्तक घेतलेला आहे.
रत्नागिरी नगर परिषदेने राजीवडा गावातील रहिवाशांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम घेण्यात यावी. या लसीकरणाच्या वेळी दुसरा डोस देण्याची तसेच ज्यांना अजूनही पहिला डोस मिळालेला नाही त्यांनाही तो देण्यात यावा, अशी मागणी राजीवडा कोअर कमिटीने मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. यावेळी राजीवडा कोअर कमिटीचे अध्यक्ष नजीर वाडकर, उपाध्यक्ष शब्बीर भाटकर, सचिव शफी वस्ता व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.