सैतवडे येथील मुलींचा संघ राज्यस्तरावर
By Admin | Updated: November 3, 2015 00:01 IST2015-11-02T22:32:23+5:302015-11-03T00:01:34+5:30
विभागीय क्रिकेट स्पर्धा : स्पर्धेत प्रथमच विद्यालयाचा संघ विजयी; मुलींनी मारला विजयी षटकार

सैतवडे येथील मुलींचा संघ राज्यस्तरावर
टेंभ्ये : दि मॉडेल इंग्लिश स्कूल, सैतवडे या शाळेतील १७ वर्षाखालील मुलींच्या संघाने सिझन बॉल कोल्हापूर विभागीय क्रिकेट स्पर्धा जिंकली.विभागीय स्पर्धेत विजयी झालेला विद्यालयाचा हा पहिलाच संघ आहे. शाळेने आपल्या यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. विजयी संघाचे मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इब्राहीम मुल्ला, जनरल सेक्रेटरी अ. शकूर चिलवान, सदस्य युसुफमियाँ खलफे, सरपंच मुनाफ वागळे, माजी सरपंच गणेश झगडे यांनी अभिनंदन केले आहे.
संघाला ऋतुजा राजेश जाधव, अविनाश केदारी व काजरोळकर यांचे मार्गदर्शन तसेच मुख्याध्यापक विलास कोळेकर यांचे विशेष प्रोत्साहन मिळाले. या संघामध्ये अमिशा धातकर, रसिका लोकरे, चेतना वाघे, साक्षी पवार, निकीता कदम, महिमा पवार, फिजा जांभारकर, मिताली वासावे, रुचिरा आंबेरकर, पूजा पावरी, मानसी धोपावकर, पूजा शिर्के , कल्पिता धातकर, शंकेश्वरी कुलये, अनामिका सावंत व अक्षता वासावे या खेळाडूंचा सहभाग होता.या विजयी संघाचे रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, खंडाळा येथील क्रीडा शिक्षक राजेश जाधव, संस्था पदाधिकारी दिलावर खान, इम्तियाज मालीम आदी मान्यवरांनी अभिनंदन केले. राज्यस्तरावरील स्पर्धा अहमदनगर येथे दि. २ ते ६ नोव्हेंबर २०१५ रोजी होणार आहे. (वार्ताहर)