शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

Ratnagiri: पैशाच्या मागणीला कंटाळून प्रेयसीचा गळा दाबून खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2023 11:48 IST

लांजा : वारंवार पैशाची मागणी करत असल्याच्या त्रासाला कंटाळून लांजा तालुक्यातील कोंड्ये येथील ४८ वर्षीय प्रेयसीचा खून केल्याची घटना ...

लांजा : वारंवार पैशाची मागणी करत असल्याच्या त्रासाला कंटाळून लांजा तालुक्यातील कोंड्ये येथील ४८ वर्षीय प्रेयसीचा खून केल्याची घटना तब्बल अडीच महिन्यांनी शुक्रवारी उघडकीस आली आहे. वैशाली चंद्रकांत रांबाडे (४८) असे मृत प्रेयसीचे नाव असून, पाेलिसांनी तिच्या खुनाप्रकरणी राजेंद्र गाेविंद गुरव (५३, रा. काेंड्ये-गुरववाडी) याला ताब्यात घेतले आहे.याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, कोंड्ये येथील वैशाली चंद्रकांत रांबाडे हिचे याच राजेंद्र गोविंद गुरव याच्याशी प्रेमसंबंध हाेते. त्यानंतर वैशाली रांबाडे ही राजेंद्र गुरव याच्याकडे वारंवार पैशाची मागणी करत होती. वारंवार हाेणाऱ्या पैशाच्या मागणीला राजेंद्र वैतागला होता. या दाेघांमध्ये दि. २८ जुलै रोजी रात्री मोबाइलवर जवळपास एक तास बोलणे झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दि. २९ जुलै रोजी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान ती कुवे येथे डॉक्टरकडे जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडली होती.

मात्र, डाॅक्टरकडे न जाता ती राजेंद्र गुरव याच्यासाेबत दि. २९ जुलै रोजी कुवे येथे जंगलमय भागात गेली हाेती. राजेंद्र यांच्या मनामध्ये धगधगत असलेल्या रागातून त्याने वैशालीच्या मानेवर काठीने जोरदार प्रहार केला. त्यानंतर त्याने तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर ताे घरी निघून आला.वैशाली ही रात्र झाली तरी डॉक्टरकडून घरी न आल्याने तिच्या पतीने शोधाशोध सुरू केली. मात्र, ती कुठेच सापडली नाही. अखेर तिच्या पतीने दि. ३० जुलै रोजी लांजा पोलिस स्थानकात याबाबत माहिती दिली. त्यानंतर राजेंद्र गुरव याची चाैकशी केली असता काहीच हाती लागले नाही.

तब्बल अडीच महिन्यांनंतर तिच्या पतीने दि. ११ ऑक्टोबर रोजी लांजा पोलिस स्थानकात राजेंद्र गुरव याने तिला फूस लावून पळवून नेत गायब केल्याची फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी राजेंद्र गुरव याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्याला आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. गुरुवारी रात्री त्याची पोलिस कोठडीत चौकशी केली असता त्याने आपण वैशाली हिचा कुवे येथील जंगलमय भागात खून केल्याचे सांगितले.उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे, पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे, उपनिरीक्षक प्रवीण देशमुख, सहायक पोलिस फौजदार भालचंद्र रेवणे, पोलिस हवालदार जितेंद्र कदम, पोलिस हवालदार अरविंद कांबळे, पोलिस हवालदार दिनेश आखाडे, पाेलिस काॅन्स्टेबल नितेश राणे, कॉन्स्टेबल सुयोग वाडकर, महिला पोलिस कॉन्स्टेबल प्रियांका कांबळे, चालक कॉन्स्टेबल चेतन घडशी, चालक सहायक पाेलिस फाैजदार संजय जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या पंचनाम्यात झाडाझुडपांमध्ये असलेल्या वस्तू शोधून काढल्या. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे, पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे हे करत आहेत.खरे बाेलतच नव्हतापत्नी घरी न आल्याने पतीने फिर्यादीत राजेंद्र गुरव याच्यावर संशय व्यक्त केला होता. त्यानुसार लांजा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवण्यास सुरुवात केली. राजेंद्र गुरव याच्यावर संशयाची सुई असल्याने त्याची चौकशीही करण्यात आली होती. मात्र, ताे पोलिसांना चौकशीत सहकार्य करत नव्हता. तसेच तो काहीच खरे बोलत नसल्याने पोलिसही हतबल झाले होते.

वारंवार विचारणाविवाहित महिला बेपत्ता झाल्यानंतरही तिचा शाेध लागत नसल्याने नातेवाईक व कुटुंबाकडून वारंवार विचारणा केली जात होती. मात्र, तिच्या बेपत्ता हाेण्यामागचे कारण समाेर येत नसल्याने पाेलिस चक्रावून गेले हाेते.

जंगलात सापडले साहित्यसंशयित राजेंद्र गुरव याला सोबत घेऊन पोलिसांनी कुवे येथील जंगलमय भागातील घटनास्थळी भेट दिली. या ठिकाणी मृत महिलेच्या वस्तू, साडी, ब्लाऊज पाेलिसांच्या हाती लागले. हे सर्व तिचेच असल्याचे तिच्या पतीने ओळखले. त्यावरून तिचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनास्थळी पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनीही भेट देऊन पाहणी केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारी