गिम्हणवणेकर यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:36 IST2021-09-14T04:36:54+5:302021-09-14T04:36:54+5:30

दापोली : तालुक्यातील गिम्हवणेच्या रहिवासी व कादिवली, जालगाव केंद्राच्या केंद्रपमुख शीतल गिम्हवणेकर यांना शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामुळे ...

Gimhanwanekar felicitated | गिम्हणवणेकर यांचा सत्कार

गिम्हणवणेकर यांचा सत्कार

दापोली : तालुक्यातील गिम्हवणेच्या रहिवासी व कादिवली, जालगाव केंद्राच्या केंद्रपमुख शीतल गिम्हवणेकर यांना शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामुळे कादिवली केंद्रातर्फे गिम्हवणेकर यांचा सत्कार करण्यात आला. केंद्रातील शिक्षक उपस्थित होते.

सीईटी परीक्षेसाठी हाॅल तिकीट

रत्नागिरी : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) घेण्यात येणाऱ्या सहा वेगवेगळ्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना हाॅल तिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावरून हाॅल तिकीट डाऊनलोड करून घेता येणार आहे. दि. १५ ते दि. १८ सप्टेंबर अखेर परीक्षा होणार आहेत.

मासेवारी सुरक्षा कार्यशाळा

गुहागर : तालुक्यातील अंजनवेल येथील आरजीपीपीएल कंपनी व महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वेलदूर नवानगर मराठी शाळेत मासेमारी सुरक्षा कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असीमकुमार सामंता यांनी मार्गदर्शन केले.

ग्रामस्थांची गैरसाेय

गुहागर : तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविद्युत सेवकांची नियुक्ती करण्यात आलेली नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत करण्यासाठी अवधी लागत आहे. आयटीआय पात्र उमेदवार मिळत नसल्याने नियुक्तीवर परिणाम झाला आहे.

Web Title: Gimhanwanekar felicitated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.