शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

शेतीचे नुकसान करणाऱ्या वानर, माकडांचा बंदोबस्त करा; रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण 

By शोभना कांबळे | Updated: October 5, 2023 15:37 IST

रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान करणाऱ्या वानर, माकडांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी वारंवार करूनही त्याकडे राज्यकर्त्यांसह प्रशासनाचे दुर्लक्ष होत ...

रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान करणाऱ्या वानर, माकडांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी वारंवार करूनही त्याकडे राज्यकर्त्यांसह प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अखेर गोळप येथील सामाजिक कार्यकर्ते अविनाश काळे यांनी गुरुवार (दि. ५) पासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर बेमुदत उपोषणाला प्रारंभ केला आहे. त्यांंच्या या उपोषणाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पहिल्या दिवसापासून पाठिंबा दिला आहे.शासनाला या प्रश्नाचे गांभीर्य कळावे, यासाठी अविनाश काळे यांनी या मागणीसाठी डिसेंबर २२ मध्ये जिल्ह्यातील ३० पेक्षा अधिक गावांमधील सुमारे २०० शेतकऱ्यांसह लाक्षणिक उपोषण केले होते. त्यानंतर २ आॅगस्ट २०२३ रोजी रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात जिल्ह्यातील शेतकऱ्यांची महत्त्वाची सभा घेण्यात आली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासन, वनविभाग यांना प्रत्येक शेतकऱ्याने निवेदन दिले होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वनमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, परिक्षेत्र वनाधिकारी या सर्वांना वानरांच्या बंदोबस्तासाठी निवेदनेही पाठविण्यात आली. मात्र, याबाबत कुणालाच दखल घेण्याची गरज वाटलेली नाही.वनखात्याच्या १९२६ या हेल्पलाइनवर शेकडो फोन करूनही प्राणी न्यायला माणसे आलेली नाहीत. वानरांचा कायमचा बंदोबस्त व्हावा. तात्पुरता उपाय म्हणून त्यांना पकडून अभयारण्यात सोडावे. शेती बागायती भयमुक्त करणे शेतकऱ्यांचा हक्क आहे. शासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा कोकणातील गावेच्या गावे ओस पडली तर पुढच्या पिढ्या कधीच माफ करणार नाहीत, असा इशाराही काळे यांनी या निवेदनाद्वारे शासनाला दिला आहे.वानर, माकडांच्या प्रचंड उपद्रवामुळे शेतकरी, बागायतदार आणि नागरिक मेटाकुटीला आले आहेत. वानर, माकडे घरावरील नळे, पत्रे फोडणे, पाईप तोडणे, घरात शिरून नासधूस करणे. माणसांच्या अंगावरही धावून येण्याचे प्रकार वाढले आहेत. गेल्या ३५ वर्षांत वानर, माकडे मारणे बंद झाल्याने त्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्याचबरोबर भटकी जनावरे, श्वान यांचाही जीवघेणा उपद्रव वाढला आहे. या समस्यांनी शेतकऱ्यांसह नागरिकही हैराण झाले आहेत. त्यामुळे यावर ठोस उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी अविनाश काळे यांनी गुरूवारपासून बेमुदत उपोषणाला प्रारंभ केला आहे. त्यांच्यासोबत जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी प्रत्यक्ष या उपोषणात सहभागी झाले आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFarmerशेतकरी