गावाकडचे इरले, घोंगडी झाले दुर्मीळपरंपरेला छेद ; अस्तित्व धोक्यात
By Admin | Updated: July 12, 2014 00:33 IST2014-07-12T00:32:52+5:302014-07-12T00:33:21+5:30
नीलेश जाधव : मार्लेश्वर, भात लावणीची कामे करताना पावसापासून बचाव करण्यासाठी पूर्वीच्या काळी शेतकरी सर्रासपणे इरले व घोंगडीचा वापर करीत असत. परंतु आता जमाना बदलला आहे.

गावाकडचे इरले, घोंगडी झाले दुर्मीळपरंपरेला छेद ; अस्तित्व धोक्यात
नीलेश जाधव : मार्लेश्वर, भात लावणीची कामे करताना पावसापासून बचाव करण्यासाठी पूर्वीच्या काळी शेतकरी सर्रासपणे इरले व घोंगडीचा वापर करीत असत. परंतु आता जमाना बदलला आहे. आधुनिक युगात प्लास्टिकच्या रेडीमेड वस्तू बाजारात आल्याने या वस्तू वापरण्याकडे शेतकऱ्यांचा कल असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे इरले व घोंगडीचा वापर आपोआप कमी झाला आहे. परिणामी इरले, घोंगडी दुर्मीळ झाली आहे.
पावसापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी पूर्वीच्या काळी भातलावणीची कामे करताना शेतकरी इरले व घोंगडीचा वापर मोठ्या प्रमाणात करीत असत. शेतकरी स्वत: इरले तयार करीत असत, तर घोंगडी विकत घेतली जात असे. एकदा तयार केलेले इरले किमान दहा वर्षे सहज होते. घोंगडीसुद्धा अनेक वर्षे टिकत असे. वारा आणि पावसाचा इरले व घोंगडीवर कोणताही परिणाम होत नाही. मुसळधार पावसात घोंगडीमुळे उबदारपणा येत असे. त्यामुळे इरले व घोंगडीलाच शेतकऱ्यांची जास्त पसंती असायची. इरले व घोंगडी वापरल्याने पावसापासून शेतकऱ्यांचा चांगल्या प्रकारे बचाव होत होता. घोंगडीमुळे तर थंडीपासून शरीराला उबही मिळत होती. सगळ्याच शेतकऱ्यांकडे इरले व घोंगडी असल्याचे पाहावयास मिळत होते. आता जमाना बदलल्याने इरले व घोंगडी दिसणेही दुरापास्त झाले आहे. सध्याच्या युगात प्लास्टिकच्या विविध रेडीमेडी वस्तू बाजारात उपलब्ध होत जुन्या वस्तू कालबाह्य झाल्या आहेत.
आता शेतीची कामे करताना रेनकोट, प्लास्टिक कागद, प्लास्टिक टोप्या, गमबूट आदी रेडीमेड वस्तूंचा वापर करण्यावर आताच शेतकरी अधिक भर देत आहे.