गणपतीपुळे समुद्रात सांगलीचे तिघे बुडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 11:57 PM2019-09-18T23:57:45+5:302019-09-18T23:57:49+5:30

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथील समुद्रात सांगली येथील तिघेजण बुडाल्याची घटना बुधवारी सकाळी ८.३० वाजण्याच्यादरम्यान घडली. यातील दोघांना ...

Ganpatipule sank in the sea, sinking three sangalees | गणपतीपुळे समुद्रात सांगलीचे तिघे बुडाले

गणपतीपुळे समुद्रात सांगलीचे तिघे बुडाले

Next

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथील समुद्रात सांगली येथील तिघेजण बुडाल्याची घटना बुधवारी सकाळी ८.३० वाजण्याच्यादरम्यान घडली. यातील दोघांना वाचविण्यात यश आले असून, सुनील लक्ष्मण हदिमणी (वय ३१, रा. हनुमंतनगर, सांगली) याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह भंडारपुळे समुद्रकिनाऱ्याजवळ दुपारी ३.३० वाजण्याच्या दरम्यान आढळला.
गणपतीपुळे येथे मंगळवारी अंगारकी चतुर्थीनिमित्त विविध भागातून भाविक दाखल झाले होते. यात्रेची सांगता दुसºया दिवशी दुपारपर्यंत केली जाते. सांगली जिल्ह्यातील सहाजण मंगळवारी १७ रोजी दुपारी २ च्या सुमारास पिकअप गाडीने गणपतीपुळेकडे निघाले. रात्री ९ वाजण्याच्या सुमाराला ते गणपतीपुळे येथे पोहोचले. त्यानंतर त्यांनी देवदर्शन करुन मुक्काम केला . बुधवारी तेथून निघण्यापूर्वी सुनील लक्ष्मण हरिमणी, दत्तात्रय हिप्परकर (रा. अहिल्यानगर, सांगली), सदाशिव डफळापुरे (रा. हनुमंतनगर, सांगली), दत्तात्रय सिद्धप्पा घुगरे (३०, रा. हनुमंतनगर, सांगली), मधु भिमराव बसभित (३०, रा. विजयनगर, सांगली), राजकुमार दºयाप्पा घुगरे (३४, रा. कोल्हापूर रोड) हे सर्वजण सकाळी ८ वाजण्याच्या दरम्याने समुद्रात आंघोळीसाठी उतरले. त्यातील तिघेजण खोल समुद्राच्या पाण्यात जावू लागले. त्यात सुनील हदिमणी लाटेत अडकल्याने बेपत्ता झाला. त्याच्या पाठोपाठ जाणाºया दत्तात्रय हिप्परकर व सदाशिव डफळापुरे यांना वाचविण्यासाठी निखील सुर्वे व गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या जीवरक्षकांनी पाण्यात उडी घेतली आणि त्यांना बाहेर काढले.
दरम्यान, समुद्रात बेपत्ता झालेल्या सुनील हदिमणी याचा मृतदेह दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास तेथूनच जवळ असणाºया भंडारपुळे समुद्रकिनारी असणाºया स्मशानभूमीसमोर शोधपथकाला आढळला. मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याचे विच्छेदन करण्यात आले. त्यानंतर हा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
दोन दिवसांत दुसरी घटना

गणपतीपुळे येथे अंगारकी चतुर्थीच्या दिवशीच सांगली येथील दोन तरुणांना समुद्रात बुडताना वाचविण्यात यश आले होते. अंगारकीच्या दुसºयाच दिवशी एक तरुण बुडून बेपत्ता झाल्याची घटना घडली. गणपतीपुळे येथे बाहेर गावाहून येणाºया पर्यटकांना पाण्याचा अंदाज येत नसल्याने या दुर्घटना घडत आहेत. याबाबत येथे सूचना फलक लिहिलेला असूनही पर्यटक त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे वारंवार दिसत आहे.

Web Title: Ganpatipule sank in the sea, sinking three sangalees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.