शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांच्या कालखंडानंतर राजापुरात गंगेचे आगमन, अनेकांनी लुटला स्नानाचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 18:01 IST

विज्ञानाला आव्हान ठरत समस्त भाविकांच्या श्रध्दास्थानी असलेल्या राजापूरच्या गंगेचे बुधवारी सकाळी ६ वाजता आगमन झाले. यापूर्वी ७ मे रोजी अवतीर्ण झालेली गंगा १९ जूनला अंतर्धान पावली होती. त्यानंतर केवळ सहा महिन्यांच्या कालखंडानंतर गंगेचे आगमन झाले आहे. गंगेच्या आगमनाची वार्ता समजताच अनेकांनी गंगातीर्थ क्षेत्री जाऊन स्नानाचा आनंद लुटला.

ठळक मुद्दे७ मे रोजी अवतीर्ण झालेली गंगा १९ जूनला अंतर्धान सहा महिन्यांच्या कालखंडानंतर गंगेचे आगमन गंगेच्या आगमनाची वार्ता समजताच अनेकांनी लुटला स्नानाचा आनंद

राजापूर : विज्ञानाला आव्हान ठरत समस्त भाविकांच्या श्रध्दास्थानी असलेल्या राजापूरच्या गंगेचे बुधवारी सकाळी ६ वाजता आगमन झाले. यापूर्वी ७ मे रोजी अवतीर्ण झालेली गंगा १९ जूनला अंतर्धान पावली होती. त्यानंतर केवळ सहा महिन्यांच्या कालखंडानंतर गंगेचे आगमन झाले आहे. गंगेच्या आगमनाची वार्ता समजताच अनेकांनी गंगातीर्थ क्षेत्री जाऊन स्नानाचा आनंद लुटला.पावसाळा संपला की साधारणपणे नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात उष्ण वारे वाहू लागले की, गंगा आगमनाचे वेध लागतात. गेले काही दिवस उष्ण वारे वाहू लागल्याने गंगेच्या आगमनाची चाहूल लागली होती. यापुर्वी दर तीन वर्षांनी गंगेचे आगमन व्हायचे त्यानंतर काही दिवसांच्या वास्तव्यानंतर ती अंतर्धान पावत होती. मात्र, अलिकडच्या तिच्या आगमन व गमन या नियमित कालखंडाला छेद गेला आहे.

काही वर्षे तर ती सलग आली होती आणि तिच्या वास्तव्याला कालावधीही खूपच लांबला होता. दिनांक ३१ आॅगस्ट २०१६ साली गंगा अवतीर्ण झाल्यानंतर ७ मे २०१७ मध्ये अंतर्धान पावली होती. त्याला सहा महिन्यांचा कालावधी उलटत असतानाच गंगेचे पुन्हा आगमन झाले आहे. गंगाक्षेत्रावरील सर्वात मोठे असणारे काशिकुंड तुडुंब जलाशयाने भरले आहे. गोमुखातून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाहदेखील वाढला आहे.निसर्गाच्या रचनेत किंवा भूगर्भात काही घडामोडी घडल्या तरीही गंगेचे आगमन झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. २६ जानेवारी २००१ मध्ये गुजरातच्या भूज, कांडला परिसराला भूकंपाचा मोठा दणका बसला होता. त्यावेळी गंगेचे आगमन झाले होते. ज्यावेळी त्सुनामीचा तडाखा भारत, इंडोनेशियासहित जगाला बसला होता. त्यावेळीही गंगा अचानक अवतीर्ण झाली होती. 

टॅग्स :Rajapurchi Gangaराजापूरची गंगाRatnagiriरत्नागिरी