राजापूर : राजापूरपासून जवळच असलेल्या उन्हाळे येथील गंगामाईचे गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान आगमन झाले. ही वार्ता सर्वत्र पसरली व भाविकांनी गंगाक्षेत्रावर धाव घेतली. गुरुवार असल्याने अनेकांनी स्नानाची पर्वणी साधली. गंगेच्या मागील गमनानंतर सुमारे १६० दिवसांनी ती अवतरली असून यापुर्वी दर तीन वर्षांनी नियमित येणाऱ्या गंगामाईच्या आगमन व गमन या कालखंडाला छेद गेल्याचे अधोरेखीत ठरले आहे. गंगाक्षेत्रावरील सर्व कुंडे तुडुंब पाण्याने भरली आहेत.मागील वेळी ७ जुलै २०१८ ला गंगेचे आगमन झाले होते व १५ नोहेंबर २०१८ला ती अंतर्धान पावली होती. जवळपास शंभराहुन अधिक दिवस तिचे वास्तव होते. यापूर्वी दर तीन वर्षांनी प्रकट होणारी गंगा त्यानंतर काही काळ वास्तव्याला असायची व नंतर ती अंतर्धान पावत असे. मात्र गेल्या काही वर्षात गंगेच्या आगमन व गमन या कालखंडाला बदल झाला असल्याचे पहावयास मिळाले. या कालावधीत तिच्या वास्तव्याचा कालावधी वाढला होता. शिवाय तिचे सलग आगमन झाल्याचेही पहावयास मिळाले होते.
राजापुरात गंगामाई प्रकटली, १६० दिवसांनी गंगामाईचे पुन्हा दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 17:37 IST
राजापूरपासून जवळच असलेल्या उन्हाळे येथील गंगामाईचे गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान आगमन झाले. ही वार्ता सर्वत्र पसरली व भाविकांनी गंगाक्षेत्रावर धाव घेतली. गुरुवार असल्याने अनेकांनी स्नानाची पर्वणी साधली. गंगेच्या मागील गमनानंतर सुमारे १६० दिवसांनी ती अवतरली असून यापुर्वी दर तीन वर्षांनी नियमित येणाऱ्या गंगामाईच्या आगमन व गमन या कालखंडाला छेद गेल्याचे अधोरेखीत ठरले आहे. गंगाक्षेत्रावरील सर्व कुंडे तुडुंब पाण्याने भरली आहेत.
राजापुरात गंगामाई प्रकटली, १६० दिवसांनी गंगामाईचे पुन्हा दर्शन
ठळक मुद्देराजापुरात गंगामाई प्रकटली१६० दिवसांनी गंगामाईचे पुन्हा दर्शन