काव्यलेखन स्पर्धेत गणेश निकम प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:37 IST2021-09-17T04:37:14+5:302021-09-17T04:37:14+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क खेड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्रच्या रत्नागिरी व पालघर जिल्हा शाखांतर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ...

Ganesh Nikam first in poetry writing competition | काव्यलेखन स्पर्धेत गणेश निकम प्रथम

काव्यलेखन स्पर्धेत गणेश निकम प्रथम

लाेकमत न्यूज नेटवर्क

खेड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्रच्या रत्नागिरी व पालघर जिल्हा शाखांतर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ऑनलाइन काव्यलेखन स्पर्धेचा निकाल घोषित केला आहे. या स्पर्धेत गणेश निकम यांची कविता सर्वोत्कृष्ट ठरली आहे.

या स्पर्धेसाठी ‘शब्द माझे सोबती...!’ असा शब्द देण्यात आला होता. विजेत्यांमध्ये अनुक्रमे गणेश निकम (गणेशपूर), अविनाश ठाकूर (डोंबिविली), सुनीता कपाळे (औरंगाबाद), वर्षा वराडे (ठाणे), सुचित्रा कुंचमवार (नवी मुंबई) यांचा समावेश आहे. या स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षीस आतार बाबुबाल (सोलापूर), गौरी शिरसाट (मुंबई), रंजना अय्यर (मुंबई), अक्षय मुळे (परभणी), समृद्धी भुवड (रत्नागिरी) यांना प्रदान करण्यात आले.

स्पर्धेचे परीक्षण रिया पवार (दहिसर) यांनी केले. विचारमंचचे संस्थापक मनोज जाधव, प्रा. सुरेश कुराडे, सुनील सुरेखा, जितेंद्र मोहिते यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. स्पर्धेचे नियोजन पूनम गमरे (मुंबई), गौरव भंडारे मुंबई, अनुपमा जाधव (पालघर) यांनी केले होते.

Web Title: Ganesh Nikam first in poetry writing competition