संजय करंबेळे यांच्यावर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:32 IST2021-03-31T04:32:09+5:302021-03-31T04:32:09+5:30

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कासारकोळवण येथील संजय तुकाराम करंबेळे (५०) यांचा सोमवारी ३.३५ वाजता आंगवली येथे बुडून मृत्यू झाला ...

Funeral on Sanjay Karambele | संजय करंबेळे यांच्यावर अंत्यसंस्कार

संजय करंबेळे यांच्यावर अंत्यसंस्कार

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कासारकोळवण येथील संजय तुकाराम करंबेळे (५०) यांचा सोमवारी ३.३५ वाजता आंगवली येथे बुडून मृत्यू झाला होता. त्यांच्यावर मंगळवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

देवरुख पोलीस स्थानकात याबाबतची फिर्याद प्रवीण जयराम डाफळे (३४, रा. कासारकोळवण डाफळेवाडी) यांनी दिली होती. प्रवीण आणि संजय हे दोघे सोमवारी दुपारी बावनदी पात्रात पोहायला गेले होते. आंगवली येथील बावनदी सोरकोळी डोहात पोहत असताना संजय करंबेळे यांना पाण्याचा अंदाज न आल्याने डोहात बुडू लागले. प्रवीण डाफळे याने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत पाण्याच्या बाहेर काढले. संजय यांना तत्काळ बेशुध्द अवस्थेत असताना देवरुख ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र देवरुख ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक यांनी तपासणी करून मृत घोषित केले.

संजय यांचा मृतदेह संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन करण्यासाठी नेण्यात आला. मध्यरात्री हा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर संजय यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. संजय यांच्या अचानक जाण्याने करंबेळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. संजय यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आहेत.

संजय हे गेली अनेक वर्षे कामानिमित्त मद्रास येथे होते. मात्र लॉकडाऊनमध्ये गेल्या वर्षी ते गावाला आले. त्यानंतर येथेच त्यांचे वास्तव्य होते.

.........................

फोटो आहे.

Web Title: Funeral on Sanjay Karambele