नातेवाइकांविना ‘त्या’परराष्ट्रीयन मुलीवर अखेर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:31 IST2021-04-11T04:31:27+5:302021-04-11T04:31:27+5:30
दापोली : तालुक्यातील बुरोंडी मार्गावरील हाॅटेल फर्न समाली रिसाॅर्ट येथे ट्रेनी म्हणून काम करणाऱ्या उत्तराखंड राज्यातील अनुराधा कुवर हिने ...

नातेवाइकांविना ‘त्या’परराष्ट्रीयन मुलीवर अखेर अंत्यसंस्कार
दापोली : तालुक्यातील बुरोंडी मार्गावरील हाॅटेल फर्न समाली रिसाॅर्ट येथे ट्रेनी म्हणून काम करणाऱ्या उत्तराखंड राज्यातील अनुराधा कुवर हिने कर्मचारी निवासात आत्महत्या केली हाेती. अखेर सहा दिवसांनी दापोलीतच तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अनुराधा कुवर हिने रिसाॅर्टच्या कर्मचारी निवासात पंख्याला ओढणीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली होती. कुवर हिचे घर महाराष्ट्रापासून लांब असल्यामुळे तिचे नातेवाईक तिचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी येऊ शकले नाहीत. भारत-नेपाळच्या हद्दीलगत अनुराधा कुवर हिची वस्ती आहे. कुवर हिचे आई-वडील हे शेतमजूर म्हणून काम करतात. त्यांची आर्थिक परिस्थितीही बेताची असल्याचे समोर येत आहे. तसेच त्यांना दापोलीपर्यंत येण्यास शक्य होत नसल्यामुळे मुलीचे अंत्यविधी करण्याची लेखी परवानगी दापोली पोलिसांना दिली आहे. अनुराधासोबत आलेले मित्र-मैत्रीण यात तिचे नातेसंबंधातील मुले आहेत. त्यामुळे अंत्यसंस्कारची जबाबदारी या मुलांना देण्यात आली. या चारजणांच्या उपस्थितीत अनुराधावर शुक्रवारी (९ एप्रिल) अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणाचा तपास दापोली पोलिसांकडून सुरू असून, दापोलीचे पोलीस उपनिरीक्षक महेश धोंडे अधिक तपास करीत आहेत.