भाडे कराराने गाडी घेऊन अडीच लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:31 IST2021-05-12T04:31:58+5:302021-05-12T04:31:58+5:30
चिपळूण : चारचाकी गाडी भाडे कराराने घेऊन त्याचे भाडे न देता तसेच गाडीदेखील मालकाच्या ताब्यात न देता पळ काढणाऱ्या ...

भाडे कराराने गाडी घेऊन अडीच लाखांची फसवणूक
चिपळूण : चारचाकी गाडी भाडे कराराने घेऊन त्याचे भाडे न देता तसेच गाडीदेखील मालकाच्या ताब्यात न देता पळ काढणाऱ्या विरोधात चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनुसार पंकज रमाकांत नरवणकर (रा. पाग, चिपळूण) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिपळूण बाजारपेठेतील शीला शंकर ओतरी यांच्या मालकीची एन्जॉय ही चारचाकी गाडी चिपळूण पाग येथील पंजक रमाकांत नरवणकर यांनी एप्रिल २०२० मध्ये भाडे करारावर वापरण्यास घेतली होती. परंतु, त्यांनी अद्याप गाडीचे भाडे दिलेले नाही. तसेच गाडीही ताब्यात न देता येथून पळ काढला आहे. त्यामुळे आपली फसवणूक झाली असल्याचे शीला ओतरी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पंकज नरवणकर याच्यावर येथील पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक झेंडे या करीत आहेत.