रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाने चौघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:33 IST2021-08-23T04:33:50+5:302021-08-23T04:33:50+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाने ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर रविवारी पुन्हा नव्या रुग्णांची संख्या शंभरच्या आत आली असून, ...

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाने चौघांचा मृत्यू
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाने ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर रविवारी पुन्हा नव्या रुग्णांची संख्या शंभरच्या आत आली असून, ९३ बाधित रुग्ण सापडले आहेत. १८९ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. जिल्ह्यात १,५४१ रुग्ण उपचार घेत आहेत.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांसह मृत्यूचे प्रमाणही कमी हाेऊ लागले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. जिल्ह्यात खेड, चिपळूण, संगमेश्वर आणि रत्नागिरी या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण २,२४९ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृत्यूचे प्रमाण ३ टक्के आहे.
जिल्ह्यात कोरोना चाचण्या करण्याचे प्रमाण ५ हजारांपेक्षा कमी झाले आहे. आरटीपीसीआर चाचणीमध्ये ५० तर ॲंटिजन चाचणीत ४३ बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यात मंडणगड तालुक्यात ४ रुग्ण, दापोलीत ६, खेडमध्ये १०, गुहागरात ३, चिपळुणात ३५, संगमेश्वरात ३, रत्नागिरीत १८, लांजात ५ आणि राजापुरात ९ रुग्ण सापडले. जिल्ह्यात एकूण ७४,९७४ रुग्ण झाले आहेत, तर ७१,१८४ रुग्ण बरे झाले असून, त्याचे प्रमाण ९४.९४ टक्के आहे.