शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

Nilesh Rane: अंगावर आल्यास कुणालाही सोडत नाही, निलेश राणे संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 18:52 IST

आमचा स्थानिकांच्या व्यवसायाला विरोध नाही. स्थानिकांनी पोट भरावे. त्यामुळे स्थानिक व्यवसायिकांनी घाबरू नये. तुमची कातडी वाचविण्यासाठी तुम्ही स्थानिकांना भडकवून स्वतःला वाचविण्याचा जो केविलवाणा प्रयत्न करीत आहात. तो हास्यास्पद आहे.

खेड : पोकळ धमक्यांना आम्ही भीक घालत नाही आणि आमच्या अंगावर आल्यास आम्ही कुणालाही सोडत नाही. आम्हाला आव्हान देण्याचे कारण काय ? तुम्ही कोण ? तुम्हाला शिवसेनेत जायचे आहे. म्हणून तुम्ही अशी भाषा वापरता की काय ? अशा रोखठोक भाषेत भाजपचे प्रदेश सचिव आणि माजी खासदार निलेश राणे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. ते भरणे नाका येथील हॉटेल बिसू येथे पत्रकारांशी बोलत होते.ते म्हणाले की, दापोलीत जी कारवाई आम्हाला अपेक्षित आहे. त्या अनधिकृत बांधकामाच्या विरोधात प्रशासनाने काय केले. याचा जाब विचारण्यासाठीच किरीट सोमय्यादापोलीत आले आहेत. त्यामध्ये कुणाच्याही पोटात दुखायची गरज नाही. तुम्ही कोण आम्हाला आव्हान देणार तुम्हाला शिवसेनेत जायचे आहे. म्हणून असे बोलता की काय ? असे दापोलीचे माजी आमदार संजय कदम यांचे नाव न घेता राणे यांनी सवाल उपस्थित केला.दापोलीतील अनधिकृत मालमत्ता ही मनीलॉड्रींगच्या व्यवहारातून घेतली आहे. तेथूनच या प्रकरणाची सुरुवात झाली आहे का ? या मालमत्तेसाठी पैसा आला कुठून याची चौकशी होणे गरजेचे आहे. उद्या दुबई, पाकिस्तानातील लोक दापोलीत येतील आणि मालमत्ता उभी करतील ते आपल्याला चालणार आहे का, असे राणे म्हणाले.आमचा स्थानिकांच्या व्यवसायाला विरोध नाही. स्थानिकांनी पोट भरावे. त्यामुळे स्थानिक व्यवसायिकांनी घाबरू नये. तुमची कातडी वाचविण्यासाठी तुम्ही स्थानिकांना भडकवून स्वतःला वाचविण्याचा जो केविलवाणा प्रयत्न करीत आहात. तो हास्यास्पद आहे, असेही राणे म्हणाले.

यावेळी विनोद चाळके रामदास राणे, राजू रेडीज, वैजेश सागवेकर, अनिकेत कानडे, रोहन राठोड, अविनाश माने, भूषण काणे, राकेश पाटील, दादा धामणकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNilesh Raneनिलेश राणे dapoli-acदापोलीKirit Somaiyaकिरीट सोमय्याShiv Senaशिवसेना