दापोली कृषी विद्यापीठाचे माजी शिक्षण संचालक गोविंद जोशी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:35 IST2021-09-22T04:35:50+5:302021-09-22T04:35:50+5:30

दापाेली : दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे माजी शिक्षण संचालक डॉ. गोविंद जोशी (७०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. शेवटपर्यंत ...

Former Director of Education, Dapoli Agricultural University, Govind Joshi has passed away | दापोली कृषी विद्यापीठाचे माजी शिक्षण संचालक गोविंद जोशी यांचे निधन

दापोली कृषी विद्यापीठाचे माजी शिक्षण संचालक गोविंद जोशी यांचे निधन

दापाेली : दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे माजी शिक्षण संचालक डॉ. गोविंद जोशी (७०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. शेवटपर्यंत ते कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील हाेते.

बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर डाॅ. जाेशी यांनी कृषी क्षेत्राच्या हितासाठी त्यांनी विविध स्तरावर काम केले होते. सेवानिवृत्तीनंतरही ते सतत विद्यापीठाच्या संपर्कात होते. तसेच विद्यापीठाचा कोकणातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा व्हावा या दृष्टीने ते प्रयत्नशील होते. कुणबी समाजोन्नती संघाच्या हितासाठी, तसेच नवभारत छत्रालयाच्या हितासाठी सतत झटत राहिले.

कृषी महाविद्यालय प्राचार्य व शिक्षण संचालक या पदावर काम करताना विद्यार्थ्यांच्या हिताचे अनेक धोरणात्मक निर्णय त्यांनी घेतले होते. कृषीच्या शिक्षणापासून कोणताही गरीब होतकरू विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी ते नेहमी प्रयत्नशील हाेते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Former Director of Education, Dapoli Agricultural University, Govind Joshi has passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.