शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
3
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
4
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
5
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
6
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
7
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
8
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
9
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
10
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
11
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
12
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
13
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
14
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
15
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
16
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
17
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
18
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
20
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?

Ratnagiri: खैर तस्करी करणारी दापोलीतील टोळी गजाआड, खालापूर येथील वन विभागाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 15:24 IST

मंडणगड परिसरातून १४ घनमीटर खैर जप्त

दापोली (जि. रत्नागिरी) : खालापूर तालुक्यातील चावणी परिसरात राखीव वनक्षेत्रातील खैर वृक्षांची तोड करून तस्करी करणाऱ्या दापाेलीतील पाचजणांना अटक करण्यात आली आहे. तसेच एका चारचाकी वाहनासह दुचाकी जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी (१५ सप्टेंबर) मध्यरात्री करण्यात आली. याप्रकरणी न्यायालयाने या पाचजणांना पाच दिवसांची वनकोठडी सुनावली आहे.खालापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार यांना चावणी परिसरात बेकायदेशीर खैर वृक्षतोड सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर वन विभागच्या पथकाने एका पिकअप वाहनावर खैर लाकडे भरत असताना कारवाई केली. अंधाराचा फायदा घेत काही आरोपी पळून गेले. मात्र, चालक रूपेश विनायक पवार (वय ३४, रा. कुडावळे, ता. दापोली) याला ताब्यात घेऊन वाहनाची तपासणी केली असता त्यात खैर लाकडे आढळली.रूपेशच्या चौकशीतून या तस्करीत आणखी चारजणांचा सहभाग असल्याचे उघडकीला आले. त्यानंतर पोलिसांनी राम शिवाजी पवार याला शेमडी चावणी रस्त्यावरून दुचाकीसह ताब्यात घेतले, तर पाली वाकण येथून किरण हरिश्चंद्र पवार, रोहित दीपक जाधव व ऋतिक शशिकांत पवार (सर्व रा. कुडावळे, ता. दापोली) यांना अटक करण्यात आली.

मंडणगड परिसरातून १४ घनमीटर खैर जप्तअधिक चौकशी केली असता या टोळीने यापूर्वीही विविध राखीव वनक्षेत्रांत खैर वृक्षतोड करून तस्करी केल्याचे उघड झाले आहे. त्यांच्या जबाबानुसार मंडणगड परिसरातही धाड टाकून १४ घनमीटर खैर लाकडे जप्त करून दापोली वनपरिक्षेत्राच्या ताब्यात देण्यात आली आहेत.