चिपळुणात झायलो गाडीसह विदेशी दारु जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:36 IST2021-05-25T04:36:00+5:302021-05-25T04:36:00+5:30
चिपळूण : तालुक्यातील मोरवणे फाटा येथे विदेशी दारुच्या दोन बॉक्सची झायलो गाडीतून वाहतूक करणाऱ्या तरुणाला येथील पोलिसांनी रविवारी ताब्यात ...

चिपळुणात झायलो गाडीसह विदेशी दारु जप्त
चिपळूण : तालुक्यातील मोरवणे फाटा येथे विदेशी दारुच्या दोन बॉक्सची झायलो गाडीतून वाहतूक करणाऱ्या तरुणाला येथील पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले. याप्रकरणी झायलो गाडीसह ३ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
प्रथमेश दीपक मांडके (२६, मूळ रा. वेळवी, दापोली, सध्या रा. विंध्यवासिनी रोड, तटकरे इमारत, चिपळूण) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. तो आपल्या झायलो गाडीतून दोन बॉक्स विदेशी दारु घेऊन जात होता. सुमारे ७ हजार रुपये किमतीची दारु व ३ लाख ५० हजार रुपये किमतीची झायलो गाडी असा ३ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याबाबत पोलीस नाईक आशिष अशोक भालेकर यांनी फिर्याद दिली आहे.