कचरा टाकणाऱ्यांवर फौजदारी

By Admin | Updated: August 1, 2014 23:26 IST2014-08-01T22:48:12+5:302014-08-01T23:26:00+5:30

राजापूर नगर परिषद : नव्या नगराध्यक्षांची घोषणा

Foreclosure on garbage shoppers | कचरा टाकणाऱ्यांवर फौजदारी

कचरा टाकणाऱ्यांवर फौजदारी

राजापूर : राजापूर शहरातील सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा राजापूर नगरपरिषदेने दिला आहे. येत्या पंधरा दिवसांत शहरातील सर्व पथदीप सुरु करण्याची ग्वाही दिली आहे. शहरात फिरणाऱ्या मोकाट जनावरांचा लवकरच बंदोबस्त करण्यात येईल, अशी माहिती राजापूरच्या नगराध्यक्ष मुमताज काझी व उपनगराध्यक्ष रवींद्र बावधाकर यांनी पत्रकारांना दिली आहे.
शहराच्या सर्वांगिण विकासाला प्राधान्य देताना शहरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर आता कोणतीही पूर्वकल्पना न देता कारवाई करण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी लावण्यात आलेले कचरा टाकण्याचे फलकही गायब झाल्यामुळे कोठेही पुन्हा तसे फलक लावण्यात येणार नाहीत. त्यामुळे आता नागरिकांनी स्वच्छतेच्या बाबतीत स्वत: दक्ष राहावे व नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी नगराध्यक्षांनी केले आहे.
राजापूर शहरातील मुख्य रस्ते व विविध प्रभागातील बंद पथदीप येत्या १५ आॅगस्ट पूर्वी सुरु करण्यात येतील. यासाठी लागणारे सामान व मनुष्यबळ नगरपरिषदेकडे उपलब्ध असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. बाजारपेठेतील रस्त्यावर अतिक्रमण झाल्यामुळे रस्ताच गायब झाला आहे. त्यामुळे व्यापारी व नागरिकांनी आपली अतिक्रमणे लवकरात लवकर स्वत: हटवावीत, यासाठी नगरपरिषदेकडून त्यांना लेखी पत्र देण्यात आली आहेत. इतके करूनही अतिक्रमणे हटवण्यात न आल्यास नगररिषद प्रशासन ती काढून टाकेल, असा इशाराही यावेळी नगराध्यक्षांनी दिला.
रस्त्यावरील झाडी तोडण्याचे कामही करण्यात येत आहे. शहराच्या अनेक भागात व नदीपात्रात कचरा टाकण्याचे प्रमाण अधिक आहे. आता नदीपात्रात व सार्वजनिक ठिकाणी कोणीही कचरा टाकू नये, अशा प्रकारे कचरा टाकणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून, त्याचा परिणाम पुढील आठवडाभरातच दिसून येईल. (प्रतिनिधी)
मध्यंतरी राजापूर नगरपरिषदेने शहरात प्लास्टिक बंदी लागू केली होती. मात्र, आता सर्वत्र प्लाास्टीक पिशव्यांचा वापर होताना दिसून येत आहे. आटवडा बाजार व बाजारपेठेतही या प्लास्टिकच्या पिशव्या व्रिकीसाठी ठेवण्यात आल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्लास्टिक पिशव्या वापरावरील बंदी शहरात खऱ्या अर्थाने कधी लागू होणार, असा प्रश्न शहरवासीयांमधून विचारण्यात येत आहे.

Web Title: Foreclosure on garbage shoppers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.