सरल प्रणाली वापरासाठी सक्ती

By Admin | Updated: August 4, 2015 23:48 IST2015-08-04T23:48:18+5:302015-08-04T23:48:18+5:30

सचिव नंदकुमार : काम पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आदेश

Force to use simple system | सरल प्रणाली वापरासाठी सक्ती

सरल प्रणाली वापरासाठी सक्ती

सागर पाटील- टेंभ्ये -शाळा, शिक्षक, विद्यार्थी व संस्था यांची माहिती सरल या संगणकीय प्रणालीद्वारे भरण्याबाबत शासनाने ३ जुलै रोजी आदेश काढला आहे. याबाबत माहिती भरण्याचे काम संथ गतीने सुरु असल्याने शिक्षण सचिव नंदकुमार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरल प्रणालीच्या कामाला प्राधान्य देऊन १५ आॅगस्टपर्यंत हे काम पूर्ण करण्याचा आदेश आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी काढला आहे. यासंदर्भात संस्थेची माहिती भरल्याशिवाय अन्य माहिती भरता येणार नाही. हा गैरसमज असल्याचे भापकर यांनी पत्रात नमूद केले आहे. तसेच विद्यार्थ्यांची बहुतांश माहिती शाळेच्या जनरल रजिस्टरवरुन भरता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील केवळ २२,२९० शाळांनी माहिती भरल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याशी संपर्क साधला असता नुकत्याच झालेल्या सर्व संघटनांच्या बैठकांमध्ये याबाबतचे गांभीर्य त्यांनी पटवून दिले असून, तत्काळ माहिती भरण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.या प्रणालीमध्ये सर्वात प्रथम संस्था आॅनलाईन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. यामध्ये अनेक संस्थांसमोर अद्ययावत पी. टी. आर. उताऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. माहितीनुसार धर्मादाय आयुक्ताकडे नोंद असलेला शेवटचा पी. टी. आर. उतारा अपलोड करता येणार आहे. संस्था रजिस्ट्रेशन झाल्यानंतर यासाठी वापरलेल्या सर्व कागदपत्रांची हार्ड कॉपी शिक्षण विभागात दाखवून माध्यमिक शाळांनी संस्था रजिस्ट्रेशनला शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांची मान्यता घेणे आवश्यक असल्याचे उपशिक्षणाधिकारी डी. एस. पोवार यांनी सांगितले. शिक्षणाधिकाऱ्यांची मान्यता घेतल्यानंतर शाळा व शिक्षकांसंदर्भात माहिती भरता येणार आहे. मात्र शिक्षणाधिकाऱ्यांची मान्यता मिळेपर्यंत विद्यार्थ्यांची माहिती भरता येणे शक्य असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले. संस्था रजिस्ट्रेशनला शिक्षणाधिकाऱ्यांची मान्यता मिळाली नाही. म्हणून सर्वच काम थांबविणे चुकीचे असल्याचे सांगण्यात आले.विद्यार्थ्याच्या माहितीमध्ये विद्यार्थ्याचे नाव, आईचे नाव, आधार कार्ड नंबर किंवा ईआयडी आधार कार्ड पावती नंबर, ब्लड ग्रुप (तपासला असेल तर), लिंग, जन्मतारीख, इयत्ता, शाखा, तुकडी, माध्यम, जन्मतारीख, इयत्ता, शाखा, तुकडी, माध्यम, धर्म, जात, प्रवर्ग, वार्षिक उत्पन्न, दारिद्र्यरेषेखालील आहे का? असल्यास क्रमांक, मागील इयत्ता, गुण, विद्यार्थ्याचा पत्ता, जन्मतारीख, जन्म ठिकाण, जन्मदाखला क्रमांक (असेल तर), कौटुंबिक माहितीमध्ये आई, वडील, बहीण, भाऊ यांची माहिती, बहिण, भाऊ बारावीपर्यंत शिकत असेल तर शाळेचा व्िर२ी क्रमांक, बँक संदर्भातील माहितीमध्ये खाते क्रमांक, कऋरउ कोड, शाखा, बँक इतर माहिती भरणे आवश्यक आहे. ही सर्व माहिती आॅफलाईन पद्धतीने भरता येणार आहे. विद्यार्थ्यांची प्राथमिक माहिती भरल्यानंतर माहिती बरोबर असल्यास विद्यार्थ्यांचा आयडी तयार होणार असल्याने याकडे सर्व शाळांनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.


दिरंगाई चालणार नाही...
जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांनी सरल संगणक प्रणालीमध्ये दिलेल्या मुदतीत माहिती भरणे आवश्यक आहे. त्यात दिरंगाई केल्यास त्याचे परिणाम शाळेतील सर्व घटकांवर होणार आहेत. आॅनलाईन प्रणाली नोंद झालेले विद्यार्थी म्हणजेच शाळेचा पट गृहीत धरण्यात येणार आहे. या पटावर आधारितच संचमान्यता करता येणार असल्याने याचे महत्त्व आहे. यासंदर्भात अडचण आल्यास हेल्पलाईन नंबर १८००२३३०७०० वर संपर्क साधावा.
- किरण लोहार,
माध्यमिक शिक्षणाधिकारी, रत्नागिरी

जिल्ह्यातील माध्यमिक शाळेमधील सर्व मुख्याध्यापकांनी आवश्यक ती सर्व माहिती घेऊन सरल प्रणालीचे काम १५ आॅगस्टपूर्वी पूर्ण करावे. यासंदर्भात समस्या असल्यास मुख्याध्यापक संघाशी संपर्क साधावा.
- विजय पाटील, जिल्हा मुख्याध्यापक संघ

Web Title: Force to use simple system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.