सरपंच पदाच्या आसनात विराजमान न हाेता वाहिले पुष्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:35 IST2021-08-12T04:35:27+5:302021-08-12T04:35:27+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क मंडणगड : तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत तिडे-तळेघरचे दिवंगत सरपंच सूर्यकांत बैकर यांच्या निधनानंतर सरपंच पदाची पोटनिवडणूक जाहीर ...

The flower flowed without sitting in the seat of Sarpanch | सरपंच पदाच्या आसनात विराजमान न हाेता वाहिले पुष्प

सरपंच पदाच्या आसनात विराजमान न हाेता वाहिले पुष्प

लाेकमत न्यूज नेटवर्क

मंडणगड : तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत तिडे-तळेघरचे दिवंगत सरपंच सूर्यकांत बैकर यांच्या निधनानंतर सरपंच पदाची पोटनिवडणूक जाहीर झाली होती. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या सुषमा खैरे या सरपंचपदी विराजमान झाल्या. यावेळी नवनिर्वाचित सरपंच यांनी आसनात विराजमान न होता आसन रिकामे ठेवून त्यावर पुष्प अर्पण करून दिवंगत सरपंच सूर्यकांत बैकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.

मंडणगड तालुक्यातील तिडे - तळेघर ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच सूर्यकांत बैकर यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सरपंच पद रिक्त हाेते. या रिक्त पदासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली हाेती. या निवडणुकीत शिवसेनेच्या सुषमा खैरे यांनी बाजी मारली. त्यांच्या नावाची घाेषणा करताच शिवसैनिकांनी जल्लाेष केला.

या कार्यक्रमावेळी शिवसेनेचे मंडणगड तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर, सभापती स्नेहल सकपाळ, महिला तालुका संघटक अमिता शिंदे, उपतालुका प्रमुख सुरेश दळवी, विभागप्रमुख दीपक मालुसरे, उपविभाग प्रमुख दयानंद येसरे, महिला आघाडी उपतालुका संघटक समीक्षा लोखंडे, शिवसेना कार्यालय प्रमुख संतोष पार्टे, शिवसेना तालुका सचिव सिद्धेश देशपांडे, म्हाप्रळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अझर मुकादम, युवासेना प्रभारी तालुकाधिकारी जितेंद्र पाटील, विभाग अधिकारी देवीचंद गणवे, निशिकांत पवार, विभाग संघटक युवासेना रुपेश म्हाप्रळकर, मुंबई गाव संघटक विशाल येसरे, तळेघर गाव संघटक शैलेश जाधव, शिवसेना शाखा प्रमुख दत्ता गिम्हवनेकर, सचिन तांबुटकर, गाव अध्यक्ष अविनाश निमदे, तळेघर शाखाप्रमुख संदेश करावडे, माजी सरपंच दिलावर वलेले, माजी शाखाप्रमुख दत्ता म्हाप्रळकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शिवसैनिक उपस्थित होते.

Web Title: The flower flowed without sitting in the seat of Sarpanch