पूरग्रस्त शिक्षक, कर्मचाऱ्यांना शिक्षक भारतीतर्फे मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:35 IST2021-08-24T04:35:27+5:302021-08-24T04:35:27+5:30
खेड : पूरग्रस्त स्थितीमुळे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील कर्मचाऱ्यांचेही प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून, याची दखल घेत शिक्षक ...

पूरग्रस्त शिक्षक, कर्मचाऱ्यांना शिक्षक भारतीतर्फे मदत
खेड : पूरग्रस्त स्थितीमुळे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील कर्मचाऱ्यांचेही प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून, याची दखल घेत शिक्षक भारतीच्या रत्नागिरी जिल्हा शाखेतर्फे चिपळूण, संगमेश्वर, महाड आदी शहरांतील पूरग्रस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना रोख रकमेच्या स्वरूपात मदतनिधीचे वाटप करण्यात आले.
यावेळी शिक्षक भारती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पूरग्रस्त भागातील माध्यमिक शाळांना प्रत्यक्ष भेट देत वस्तुस्थिती जाणून घेतली. या आर्थिक मदतीसाठी ठाणे, पालघर, रायगड व सिंधुदुर्ग या सर्वच जिल्ह्यांतील शिक्षक भारतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. या दौऱ्यामध्ये शिक्षक भारतीचे जिल्हा कार्याध्यक्ष व मुख्याध्यापक सुभाष जाधव, जिल्हा कार्यवाह नीलेश कुंभार, शिवाजी शिंदे, मिलिंद कडवईकर, राजेश माळी, आत्माराम तवटे, सुनील निर्मळ सहभागी झाले होते.