शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

Ratnagiri: राजापुरात पूर ओसरला, जनजीवन पूर्वपदावर

By मनोज मुळ्ये | Published: July 25, 2023 5:20 PM

जवाहर चौकातील एसटी वाहतूक सोमवारी सकाळपासून पूर्ववत

राजापूर : तालुक्यात रविवारी रात्रीपासून संततधार पडणाऱ्या पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने अर्जुना आणि कोदवली नद्यांना आलेला पूर ओसरला आहे. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले आहे. अर्जुना आणि कोदवलीच्या पुराच्या पाण्याने जवाहर चौकात तळ ठोकल्याने रविवारी बंद ठेवण्यात आलेली जवाहर चौकातील एसटी वाहतूक सोमवारी सकाळपासून पूर्ववत सुरू झाली आहे.तालुक्यातील राजापूर शीळ, गोठणेदोनिवडे, चिखलगाव रस्त्यावरील पाणी ओसरल्याने या मार्गावरील वाहतूकही पूर्ववत सुरळीत सुरू झाली आहे. मात्र, तरीही पुढील दोन दिवस पावसाचा इशारा देण्यात आल्याने प्रशासन सतर्क आहे. मुसळधार पावसामुळे अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला व या पुराच्या पाण्याने जवाहर चौकात धडक दिली होती. गेले पाच दिवस राजापुरात पूरसदृश्य परिस्थिती कायम होती. त्यामुळे प्रांताधिकारी वैशाली माने, तहसीलदार शीतल जाधव, पोलिस निरीक्षक भरत धुमाळ, राजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले हे ‘ऑन फिल्ड’ परिस्थितीवर जातीनिशी लक्ष ठेऊन होते.मात्र, रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर काहीसा ओसरला. त्यामुळे या दोन्ही नद्यांच्या पुराच्या पाण्याची पातळी ओसरली आहे. सोमवारपासून दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे सुरू झाले असून, जवाहर चौकातील एसटी वाहतूकही सुरळीत सुरू झाली आहे. पूर ओसरताच नगर परिषद प्रशासनाकडूनही शहरात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे.तालुक्यात काही पडझडीच्या घटना घडल्या असून, त्याचे पंचनामे करण्याच्या सूचना तहसीलदार शीतल जाधव यांनी दिल्या आहेत. धाऊलवल्ली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील प्रधान मंत्री घरकुल आवास योजनेमधून बांधून पूर्ण झालेल्या सुनंदा कृष्णा तिर्लोटकर यांच्या घरावर कलमाचे झाड कोसळले व त्यांच्या घराचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRajapurराजापुरfloodपूर