पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत मिळावी : संजय कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:36 IST2021-08-20T04:36:11+5:302021-08-20T04:36:11+5:30
दस्तुरी : खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून माजी आमदार संजय कदम यांच्यातर्फे पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत मिळावी, ...

पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत मिळावी : संजय कदम
दस्तुरी : खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून माजी आमदार संजय कदम यांच्यातर्फे पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत मिळावी, यासाठी खेड तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी प्राजक्ता घोरपडे यांना निवेदन देण्यात आले.
खेड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे महसूल खात्याकडून करण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र सरकारने पूरग्रस्तांना ११.५० कोटी निधीची घोषणा केलेली आहे. असे असताना खेड तालुक्यातील प्रशासनाकडून अद्याप शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदतीचे वाटप झालेले नाही, असे या निवेदनात म्हटले आहे. तसेच एमआयडीसीमधून रासायनिक पाणी सोडल्याने भातशेती तसेच पशुधनाचे नुकसान झाले आहे. त्याबाबत एमआयडीसी, एमपीसीबी, सीईटीपी यांनी अद्याप पंचनामा केलेला नाही, असा आरोप माजी आमदार संजय कदम यांनी केला. याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी संजय कदम यांनी केली आहे.