शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! चिपळुणातील गुहागर बायपास रस्त्यावर आढळले पाच दिवसाचे जिवंत अर्भक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2022 14:47 IST

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ही घटना समोर आल्याने आणि असे कृत्य करणाऱ्या संबंधिताविरोधात संताप व्यक्त होत आहे.

चिपळूण : शहरातील गुहागर बायपास रस्त्यालगत पाच दिवसाचे अर्भक आढळून आले आहे. स्त्री जातीचे हे अर्भक असून मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तरुणाला ते आढळून आले. या घटनेची येथील पोलिसांनी गंभीरपणे दखल घेत या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ही घटना समोर आल्याने आणि असे कृत्य करणाऱ्या संबंधिताविरोधात संताप व्यक्त होत आहे.शहरातील उक्ताड ते पाग दरम्यान असलेल्या गुहागर बायपास रस्त्यालगत एका पिराजवळ हे अर्भक आढळून आले. पाच दिवसांचा अर्भक असून एका कपड्यांमध्ये गुंडाळलेल्या स्थितीत ते होते. या रस्त्यावरून मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका तरुणाला या अर्भकाचा आवाज आला. त्याने आवाजाच्या दिशेने धाव घेतली. तेव्हा तिथे त्याला एका कपड्यांमध्ये गुंडाळलेल्या स्थितीत अर्भक दिसून आले. त्याने तात्काळ पोलिसांना संपर्क करून याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या अर्भकाला कामथे रुग्णालयात नेऊन वैद्यकीय तपासणी केली. अर्भकाची प्रकृती सुस्थितीत आहे. या घटनेचा तपास तातडीने सुरू करण्यात आला असून पोलिसांच्या पथकामार्फत याबाबतची चौकशी सुरु केली आहे.तसेच संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ही तात्काळ सुरू केली आहे. याबाबत नागरिकांना कोणतीही माहीती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी केले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारी