लोटे येथे गांजासह पाच जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:34 IST2021-08-19T04:34:29+5:302021-08-19T04:34:29+5:30
खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील गांजा बाळगणाऱ्या पाचजणांना अटक करण्यात आली आहे. दिनांक १७ रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या ...

लोटे येथे गांजासह पाच जणांना अटक
खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील गांजा बाळगणाऱ्या पाचजणांना अटक करण्यात आली आहे. दिनांक १७ रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास एका बंद कारखान्याच्या बाहेर ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश रमेश माने (२४, तलारीवाडी, गुणदे, खेड), सूरज लक्ष्मण वरक (२०, तलारीवाडी, लोटे, खेड), अमान हुसेन सौतिरकर (२०, गवळीवाडी, घाणेखुंट, खेड), विजय मारुती लोहार (१९, लोटे माळ, खेड) व मुस्तफा इस्तियाक शहा (१८, गवळीवाडी, घाणेखुंट, खेड) यांना लोटे औद्योगिक वसाहतीत बंद असलेल्या मोरॅक्स कंपनीच्याबाहेर २१५ ग्राम वजनाच्या सुमारे ३,२२५ रुपये किमतीच्या गांजासह पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयितांपैकी राकेश माने हा सराईत गुन्हेगार असून, यापूर्वीही त्याच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत. पाचही संशयितांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक इनामदार करीत आहेत.