शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

रत्नागिरीतील मासेमारी फसली समस्यांच्या गर्तेत, केवळ आश्वासनच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 16:47 IST

हंगागातील एकूण उत्पन्नावर परिणाम होवून २५ ते ३० टक्के घट होण्याची शक्यता

रत्नागिरी : हवामानात वारंवार हाेणारे बदल, मच्छीमारी नौकांची वाढती संख्या आणि एलईडीच्या साह्याने होणारी मासेमारी यामुळे हा व्यवसाय सध्या संकटात सापडला आहे. त्यातच बंदरांवर मच्छिमारांना असलेल्या अपुऱ्या सोयीसुविधांमुळे मच्छीमारी व्यवसाय ग्रासला आहे. वर्षानुवर्षे समस्या त्याच असून, उपाययोजनांचा मात्र अभाव आहे. रत्नागिरीतील मिरकरवाडा, जयगड, दापोलीतील हर्णै, राजापुरातील नाटे यासह छोट्या-मोठ्या प्रत्येक बंदरावर मच्छिमारीची स्थिती आजही ‘जैसे थे’च आहे.मासेमारी हंगामाला ऑगस्ट महिन्यात सुरूवात झाली. पहिल्या आठवड्यात पावसामुळे मासेमारीवर परिणाम झाला. मात्र, या कालावधीत मासे चांगले मिळत असल्याने धोका पत्करून मच्छीमार समुद्रावर स्वार झाले. चांगल्या प्रमाणात मासे मिळाल्याने हंगामाची सुरुवात चांगली झाल्याचा आनंद होता. त्यानंतर पावसाचा मुक्काम वाढल्यामुळे सातत्याने वादळी परिस्थितीचा सामना करावा लागला. आत्तापर्यंत सहा महिन्याच्या कालावधीत एक महिन्याचा कालावधी निसर्गाच्या प्रकोपामुळे वाया गेला. यामध्ये दिवसाला सरासरी एक कोटी रुपयांचे नुकसान याप्रमाणे सुमारे ३० कोटीहून अधिक फटका बसला, असा अंदाज वर्तवला जात आहे.किनारी भागात सापडणारा बारीक मासा फिशमिलला तर मोठा मासा खाण्यासाठी बाजारपेठेमध्ये येतो. पर्ससीननेट, ट्रॉलिंगच्या माशाला किलोला दर सुमारे ७० ते ८० रुपयांपर्यंत होता. हा दर १२० रुपयांपर्यंत मिळणे अपेक्षित होता. फिशमिललाही किलोचा १५ ते १८ रुपयांपर्यंतचा दर १२ रुपयांपर्यंत खाली आला. त्याचा फटका उत्पन्नावर बसला आहे. गिलनेटने पकडलेल्या माशाला किलोला ३० ते ४० रुपयेच दर मिळाला. याचा हंगागातील एकूण उत्पन्नावर होणार असून, २५ ते ३० टक्के घट होईल, असे मच्छिमारांकडून सांगण्यात येत आहे.एकीकडे वातावरणातील बदलामुळे मासेमारीवर परिणाम त्यात बंदरांवरील समस्यांचाही सामना करावा लागत आहे. मिरकरवाडा, हर्णै यासह छोट्या-मोठ्या बंदरांवर मच्छीमारांना सुविधा मिळत नाहीत.केवळ आश्वासनचहर्णैसारख्या बंदरात सुविधा देण्यासाठी वारंवार शासनाकडून आश्वासन मिळत आहेत. नौकांना लागणारे डिझेल बंदरांजवळ असणे, बंदरावर मासे विकणाऱ्या महिलांसाठी पुरेशी जागा, थकीत डिझेल परतावा याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfishermanमच्छीमार