शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

कर्नाटकातील मासेमारी नौका गस्ती पथकाकडून ताब्यात, रत्नागिरी समुद्रात मध्यरात्री रंगला थरार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 16:15 IST

रत्नागिरी : कर्नाटकातील मलपी येथील रत्नागिरीच्या समुद्रात अतिक्रमण करणाऱ्या नौकेला गस्ती नौकेने ताब्यात घेतले. ही नौका ताब्यात घेत असताना ...

रत्नागिरी : कर्नाटकातील मलपी येथील रत्नागिरीच्या समुद्रात अतिक्रमण करणाऱ्या नौकेला गस्ती नौकेने ताब्यात घेतले. ही नौका ताब्यात घेत असताना इतर परप्रांतीय नौकांनी गस्ती नौकेला घेरले. गस्ती नौकेवरील कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क केल्यानंतर स्थानिक मच्छीमार आणि पोलिस गस्ती नौकेच्या मदतीला धावले. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास समुद्रात हा थरार घडला.मासेमारी नौकांनी अतिक्रमण केल्याची बाब मच्छीमारांकडून ८ जानेवारी रोजी रात्री समजताच जिल्ह्याची गस्ती नौका गोळप-पावस या दिशेने रवाना झाली. बुधवारी रात्री सुमारे ११ ते ११:३० वाजण्याच्या दरम्यान मलपी येथील ३५/४० हायस्पीड ट्रॉलर नौका निदर्शनास आल्या. या नौकांचा पाठलाग करताना ‘अधिरा’ (IND-KL-०२-MM५७२४) या नौकेचा ताबा गस्ती नौकेने घेतला. त्यामुळे इतर नौकांनी गस्ती नौकेला घेरण्याचा प्रयत्न केला. तसेच पकडलेल्या नौकेवरील खलाशांनी गस्ती नौकेवरील कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.इतर नौकांनी घेरण्याचा प्रयत्न केल्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य पाहून नौकेवरील कर्मचाऱ्यांनी ही बाब मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहायक आयुक्तांच्या निदर्शनास आणताच आजूबाजूच्या मासेमारी करणाऱ्या लोकांना संदेश देऊन गस्ती नौकेला मदत करण्यासाठी विनंती करण्यात आली. ही बाब स्थानिक मच्छीमारांच्या निदर्शनास येताच आठ ते दहा मासेमारी लोकांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याशी संपर्क करून अतिरिक्त पोलिस बळ उपलब्ध करून मिरकरवाडा येथील नौकेवरून पाठवण्यात आले.मलपी येथील नौकांनी गस्ती नौका मार्गक्रमण करीत असल्याचे पाहताच नौकेवरील दोऱ्या समुद्रात सोडल्या त्यातील दोरी गस्ती नौकेच्या फॅनमध्ये अडकल्याने गस्ती नौका जागेवर बंद पडली. गस्ती नौका बंद पडल्यामुळे इतर नौकांनी हल्ला करण्याचा प्रसंग जीवावर बेतणारा होता; मात्र स्थानिक नौकांची मदत, अतिरिक्त पोलिसांची कुमक या सर्व प्रसंगावधान बाबींमुळे पकडलेली नौका तसेच गस्ती नौका टोईंग करून मिरकरवाडा बंदरात आणण्यात आल्या. या नौकेवर दावा दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSea Routeसागरी महामार्गfishermanमच्छीमारKarnatakकर्नाटक