शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मासेमारी ठप्प झाल्याने मच्छीमार आर्थिक संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 16:34 IST

मासळीच्या निर्यातीवर परिणाम

रत्नागिरी : वातावरणातील सततच्या बदलामुळे मासे मिळण्याचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. त्यामुळे मासेमारी व्यवसाय धोक्यात आला असून, त्यावर अवलंबून असलेली हजारो कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत.मासेमारी हा कोकणातील मुख्य व्यवसाय असून, जिल्ह्यातील ७,५०० पेक्षा जास्त कुटुंब मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहेत. या व्यवसायातून दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असली तरी मागील काही दिवसांपासून ही उलाढाल ठप्प झाली आहे. त्यामुळे मच्छीमार कुटुंबीयांची आर्थिक घडी विस्कटली आहे.ऑगस्ट महिन्यापासून पारंपरिक मासेमारीपाठोपाठ पर्ससीननेट मासेमारीही सुरू होते. मात्र, गेले काही महिने मासे मिळण्याचे प्रमाण चांगलेच घटले आहे. गेल्या काही दिवसांत वातावरणात अनेकदा झालेल्या बदलांमुळे बहुतांश मासेमारी नौका किनाऱ्यावरच नांगरून ठेवण्यात आल्या. ज्यावेळी वातावरण चांगले होते, त्यावेळी खोल समुद्रात जाऊनही मासे अत्यल्प प्रमाणात मिळाले. वातावरणातील बदलामुळेच मत्स्य साठ्यांवर परिणाम झाला असण्याचीही शक्यता आहे.

मासळीच्या निर्यातीवर परिणाममासे कमी प्रमाणात मिळत असल्याने ज्या नौका समुद्रात जातात, त्यांच्या खलाशांचा खर्चही भागत नाही. मासे मिळण्याचे प्रमाण कमी झाल्याने त्याचा परिणाम मासळीच्या निर्यातीवरही झालेला आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन मिळवून देणारा मासेमारी व्यवसाय धोक्यात आला आहे.

आर्थिक घडी विस्कटलीडिझेलचा खर्च, बर्फ, खलाशांचा पगार व भत्ता, जाळी व इंजिन दुरुस्ती यावर दररोज होणारा हजारो रुपये खर्च आणि मासळी विकून मिळणारे तुटपुंजे उत्पन्न याचा ताळमेळच लागत नसल्याने मच्छीमारांवर रडण्याची वेळ आली आहे. बँकेचे कर्ज तसेच व्यापाऱ्यांकडून आगाऊ रकमेची परतफेड होत नसल्याने मच्छीमारांची आर्थिक घडी विस्कटली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfishermanमच्छीमार