कोंडगाव काजळी नदीतील गाळउपशाचा पहिला टप्पा पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:33 IST2021-05-27T04:33:04+5:302021-05-27T04:33:04+5:30
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव-साखरपा काजळीनदी गाळ उपसा आणि रुंदीकरण प्रकल्पाचा पहिला टप्पा बुधवारी पूर्ण झाला. ८ फेब्रुवारी रोजी ...

कोंडगाव काजळी नदीतील गाळउपशाचा पहिला टप्पा पूर्ण
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव-साखरपा काजळीनदी गाळ उपसा आणि रुंदीकरण प्रकल्पाचा पहिला टप्पा बुधवारी पूर्ण झाला. ८ फेब्रुवारी रोजी नाम फाउंडेशनचे मल्हार पाटेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भूमिपूजन सोहळा पार पडला होता. त्यानंतर पुढील तीन महिन्यांत चांगल्या पद्धतीने हे काम पूर्ण झाले आहे.
दत्त देवस्थान, दत्त पतसंस्था, कोंडगाव ग्रामपंचायत, व्यापारी मंडळ यांच्या सहकार्यातून हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. हे काम दिवसरात्र सुरू होते. जेसीबीच्या साहाय्याने नदीपात्रातील गाळ उपसा करून नदीची रुंदी व खोली वाढविण्यात आली आहे. त्यामुळे दरवर्षी बाजारपेठेला जाणवणारा पुराचा धोका यंदा कमी प्रमाणात जाणवेल, अशी अपेक्षा केली जात आहे.
पहिल्या टप्प्याचे ठिकाण म्हणजे एक जणू पर्यटनस्थळ झाल्याचा भास होत असल्याचे अनेकांनी सांगितले. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी नाम फाउंडेशनने प्रमुख पुढाकार घेतला. या प्रकल्पासाठी गिरीश सरदेशपांडे, श्रीधर कबनूरकर व मित्रमंडळाने मेहनत घेतली. या टप्प्यामध्ये ८०० मीटर नदीपरिसर ६० मीटर रुंद आणि चार मीटर खोल करण्यात आला आहे. त्याची विधीवत पूजाही करण्यात आली.