शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात पहिला ग्रोयान्स बंधारा आंजर्ले समुद्रात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 13:51 IST

मुंबईच्या नरिमन पॉइंटच्या धर्तीवर ग्राेयान्स बंधारा बांधण्याचे काम, ७० कोटी रुपयांचा निधी मंजूर

शिवाजी गोरेदापोली : मुंबईच्या नरिमन पॉइंटच्या धर्तीवर रत्नागिरी जिल्ह्यातील पहिला ग्राेयान्स बंधारा आंजर्ले (ता. दापाेली) समुद्रात बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मेरीटाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून जागेची पाहणीही करण्यात आली आहे. या बंधाऱ्याचा फायदा खाडीतील मासेमारी बोटींना होणार असून, आंजर्लेतील पर्यटनालाही त्याचा मोठा फायदा होणार आहे. हे काम दोन ते तीन महिन्यांत पूर्ण होईल, असे मुंबईतील मेरिटाइम बाेर्डाचे मुख्य कार्यकारी अभियंता आर. एम. गोसावी यांनी सांगितले.

ग्रोयान्स बंधाऱ्यासाठी ७० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, समुद्रात ७०० मीटर लांब हा बंधारा बांधण्यात येणार आहे. समुद्रात मासेमारी करणाऱ्या बोटी खाडीत लावल्या जातात. मात्र, खाडी व समुद्राच्या मुखाशी गाळ साठल्याने अनेक वेळा समुद्राच्या मुखाशी बोटी भरकटून बोटीला जलसमाधी मिळते. मात्र, या बंधाऱ्यामुळे खाडीतील पाणीपातळीत वाढ होणार आहे. तसेच खाडीतील गाळ काढला जाणार असल्याने बोटींना ये-जा करणे सोयीचे होणार आहे. त्यामुळे दुर्घटना टळणार आहे.या बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूंना बोटी लावण्यासाठी धक्का बांधला जाणार आहे. त्यामुळे बाेटी नांगरून ठेवणे साेयीचे हाेणार आहे. तसेच बंधाऱ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर बंधाऱ्यावर काँक्रिटीकरण करून सुशोभीकरण केले जाणार आहे. त्यामुळे थेट समुद्राच्या पाण्यात जाऊन पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे.

आंजर्ले समुद्रातील बंधाऱ्याचे काम वेळेत पूर्ण केले जाणार आहे. मच्छिमार बांधव व स्थानिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची काळजी हा बंधारा बांधताना घेतली जाणार आहे. - हनुमंत जाधव, ठेकेदार 

ज्या ठिकाणी ग्राेयांस बंधारा हाेणार आहे, त्या ठिकाणाहून निसर्गाचे मनमाेहक दृश्य नजरेस पडते. खाडीचा भाग, अडखळ व पाजपंढरी ही गावे या ठिकाणाहून दिसतात. या बंधाऱ्यामुळे आंजर्लेतील पर्यटनाच्या वाढीला मदत हाेणार आहे. - संदेश देवकर, माजी सरपंच, आंजर्ले

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी