शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आपला शत्रू कोण आहे ते आधी निश्चित करा, मंत्री उदय सामंत यांचे समन्वय समितीच्या बैठकीत आवाहन

By मनोज मुळ्ये | Updated: January 11, 2024 15:00 IST

नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे असेल तर आपल्यातील वाद मिटवले पाहिजेत

रत्नागिरी : अनेकदा आपण आपापसातच भांडत बसतो. मात्र जर आपल्याला नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे असेल तर आपल्यातील वाद मिटवले पाहिजेत. त्यासाठी आपला नेमका शत्रू कोण आहे, हे सर्वांनी जाणून घेतले पाहिजे, असे सूचक उद्गार राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी काढले.शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) अशा महायुतीमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक गुरुवारी रत्नागिरीमध्ये झाली. या बैठकीत मंत्री उदय सामंत यांनी सर्वांना एकत्र पुढे जाण्याचे आवाहन केले.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पुन्हा पंतप्रधान पदावर पाहण्यासाठी सर्वजण धडपडत आहेत. त्यासाठीच मिशन ४८ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. जर सर्वांचा उद्देश एकच आहे तर सर्वांनी एकत्र राहूनच काम करायला हवे, असे ते म्हणाले. आपापसात काही मतेमतांतरे असतील तरी आपापल्या पक्षाच्या समन्वयकामार्फत त्यावर तोडगा काढायला हवा. महायुती ही केवळ लोकसभेसाठी नाही. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद गटापासून लोकसभेपर्यंत प्रत्येक निवडणुकीत आपण सर्वजण एकत्र राहिलो तर प्रत्येक ठिकाणी विजय फक्त आपलाच होईल. विरोधक नावालाही शिल्लक राहणार नाहीत, असेही ते म्हणाले.या बैठकीमध्ये भाजपाकडून समन्वयक म्हणून प्रमोद जठार, शिवसेनेकडून समन्वयक म्हणून माजी आमदार सदानंद चव्हाण आणि राष्ट्रवादीकडून समन्वयक म्हणून आमदार शेखर निकम उपस्थित होते. तीनही पक्षांचे जिल्हाध्यक्ष आणि सर्व प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.महायुती राज्यस्तरावर आहे. मात्र ग्रामीण पातळीवर अजूनही समन्वय झालेला नाही, यासह अनेक मुद्दे महायुतीतील सर्वच पक्षाच्या नेत्यांनी मांडले. ग्रामपातळीवरही समन्वय तयार व्हायला हवा, यासाठी जिल्हा समन्वय समिती आणि तालुका पातळीवरही समन्वय समिती कार्यरत राहील असे यावेळी निश्चित करण्यात आले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत