शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी केंद्रातून कॅप्टन-कॅप्टन नाटक प्रथम, सिंधुदुर्गचे निखारे द्वितीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 16:06 IST

सत्तावन्नव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रातून बसणी पंचक्रोशी ग्रंथालयाच्या कॅप्टन कॅप्टन या नाटकाने प्रथम तर वेंगुर्लेच्या कलावलय संस्थेचे निखारे नाटकाने दुसरा क्रमांक मिळाला आहे.

ठळक मुद्देराज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर स्पर्धेत एकूण १५ नाट्यप्रवेश सादर रत्नागिरीतील वि. दा. सावरकर नाट्यगृहात प्राथमिक फेरी पार

रत्नागिरी : सत्तावन्नव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रातून बसणी पंचक्रोशी ग्रंथालयाच्या कॅप्टन कॅप्टन या नाटकाने प्रथम क्रमांकासह अन्य चार वैयक्तिक बक्षिसे मिळवली आहेत.महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी रत्नागिरीतील वि. दा. सावरकर नाट्यगृहात दिनांक ६ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर या कालावधीत पार पडली होती. या स्पर्धेत एकूण १५ नाट्यप्रवेश सादर करण्यात आले होते.

या स्पर्धेचा निकाल बुधवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आला. त्यात कॅप्टन कॅप्टन या नाटकाने प्रथम क्रमांक मिळवला. वेंगुर्लेच्या कलावलय संस्थेचे निखारे हे नाटक दुसरे तर सिंधुदुर्गच्या साई कला क्रीडा मंडळाच्या अशुद्ध बिजापोटी या नाटकाला तिसरा क्रमांक मिळाला आहे.त्याशिवाय उत्कृष्ट दिग्दर्शक (मनोहर सुर्वे), उत्कृष्ट नेपथ्य (प्रवीण धुमक), प्रकाश योजना (संजय तोडणकर) यांनाही पारितोषिके मिळाली. या नाटकातील प्रमुख भूमिकेतील कलाकार ओंकार पाटील याला अभिनयाचे रौप्यपदक मिळाले आहे.दिग्दर्शनाचे द्वितीय क्रमांकाचे बक्षीस संजीव पुनाळेकर (नाटक - निखारे), प्रकाश योजनेचे द्वितीय पारितोषिक स्वानंद सामंत (नाटक - निखारे), नेपथ्य द्वितीय पारितोषिक सचिन गोताड (नाटक - ती रात्र), रंगभूषा प्रथम पारितोषिक रजनीकांत कदम (नाटक - अशुद्ध बीजापोटी), द्वितीय पारितोषिक किशोर कदम (नाटक - भावीण), उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक सानिका कुंटे (नाटक - अशुद्ध बीजापोटी), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे अंकिता नाईक (नाटक - भावीण), रूपाली परब (नाटक - बिकट वाट वहिवाट), पल्लवी माळवदे (नाटक - भावीण), सुलेखा डुबळे (नाटक - अशुद्ध बीजापोटी), प्रसाद खानोलकर (नाटक - निखारे), केदार देसाई (नाटक - अशुद्ध बीजापोटी), रवींद्र रेपाळ (नाटक - कोर्ट मार्शल), महेश पाखरे (नाटक - कुणीतरी आहे तिथं) 

टॅग्स :entertainmentकरमणूकRatnagiriरत्नागिरीsindhudurgसिंधुदुर्ग