शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

खवय्यांसाठी खुशखबर! रत्नागिरीतून हापूस आंब्याची पहिली पेटी बाजारात

By अरुण आडिवरेकर | Updated: January 2, 2023 15:45 IST

बदलते हवामान यामुळे आंबा पीक दुष्टचक्रात सापडत चालले आहे

अरुण आडिवरेकररत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातून हापूस आंब्याची पहिली पेटी बाजारात पाठविण्यात आली आहे. ही पेटी गावखडी (ता. रत्नागिरी) येथील सहदेव पावसकर यांनी पुणे येथील बाजारात पाठविली असून, चार डझनाच्या या पेटीला २० हजार दर मिळणे त्यांना अपेक्षित आहे.अवकाळी पाऊस, बदलते हवामान यामुळे आंबा पीक दुष्टचक्रात सापडत चालले आहे. बदलत्या हवामानाचा फटका या पिकाला बसत असल्याने हा व्यवसाय खर्चिक बनला आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर अगदी नोव्हेंबरपर्यंत पावसाने हजेरी लावल्याने यावर्षी आंबा पीक उशिराने येण्याची शक्यता आंबा बागायतदारांनी व्यक्त केली आहे. मात्र, मेहनतीच्या जोरावर पहिली आंबा पेटी बाजारात आणण्यात सहदेव पावसकर यशस्वी झाले आहेत.सप्टेंबर महिन्यामध्ये झाडांना मोहर आला. त्याचदरम्यान पाऊसही भरपूर पडला. पावसामुळे झाडावर मोहर राहत नव्हता, तो कुजून जात होता. पावसामुळे शेड काढावी लागली. गेल्या चार महिन्यापासून आपण मेहनत घेत असून, चार डझनांच्या या पेटीला २० हजार दर मिळण्याची शक्यता असल्याचे पावसकर यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबाMarket Yardमार्केट यार्ड