विज्ञान नाट्यामध्ये जामसूदचे ‘निसर्गापुढे काहीही नाही’ प्रथम

By Admin | Updated: December 8, 2015 00:38 IST2015-12-07T23:18:50+5:302015-12-08T00:38:32+5:30

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन : गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद, माध्यमिक शाळांचा सहभाग; बालशास्त्रज्ञांकडून विविध विषयांच्या प्रतिकृती सादर

First of all, there is nothing in front of 'Jijesud' in science drama | विज्ञान नाट्यामध्ये जामसूदचे ‘निसर्गापुढे काहीही नाही’ प्रथम

विज्ञान नाट्यामध्ये जामसूदचे ‘निसर्गापुढे काहीही नाही’ प्रथम

शृंगारतळी : गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे जिल्हा परिषद, रत्नागिरी, पंचायत समिती, गुहागर, न्यू इंग्लिश स्कूल व वरिष्ठ महाविद्यालय, पाटपन्हाळे यांच्या संयुक्त विद्यमाने कॉलेजच्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम मैदानात ४१वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते.यामध्ये तालुक्यातील जिल्हा परिषद व माध्यमिक शाळांनी सहभाग घेतला होता. तीन दिवस चालणाऱ्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सभापती राजेश बेंडल, सुरेश सावंत यांची उपस्थिती होती. बक्षीस वितरण सोहळा तहसीलदार वैशाली पाटील, गटविकास अधिकारी बी. ई. साठे, गटशिक्षणाधिकारी बी. एम. किल्लेदार, विस्तार अधिकारी डी. डी. इरनाक, महेंद्र चव्हाण, मुख्याध्यापक प्रकाश बापट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुक्यातील बालशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या विषयांच्या प्रतिकृती सादर केल्या होत्या.
यामध्ये प्राथमिक विभाग विद्यार्थी प्रतिकृती प्रथम क्रमांक राजेश बळीराम कदम, शाळा वेळंब नं. १ - बहुउपयोगी घरगुती साधन, द्वितीय क्रमांक मृदृला मंगेश पटेकर, शाळा वेलदूर नं. १ - अवती भवती गणित, तृतीय क्रमांक सोहम मकरंद विचारे, शाळा गुहागर हायस्कूल - दुष्काळमुक्त महाराष्ट्र, उत्तेजनार्थ अंकिता चंद्रकांत सोलकर, न्यू इंग्लिश स्कूल, पाटपन्हाळे, सायली संदीप मोहिते, केंद्रशाळा झोंबडी नं. १ यांनी यश मिळवले. अध्यापक निर्मिती शैक्षणिक साहित्यामध्ये प्रथम क्रमांक मकरंद विचारे - मनोरंजनातून विज्ञान, द्वितीय क्रमांक प्रकाश गोरे - मनोरंजनातून शिक्षण, तृतीय मारूती पाटील - माझी हसत खेळत अभ्यासिका, उत्तेजनार्थ रामा भवार - मानवी मेंदूचे कार्य प्रकार व काळजी, शंकर माने - रद्दीतून साकारली शिवसृष्टी यांनी यश मिळवले.अध्यापक निर्मित लोकसंख्या शिक्षण साहित्यामध्ये प्रथम क्रमांक प्रकाश गोरे - अनमोल जीवन, द्वितीय क्रमांक बाबासाहेब राशिनकर - आॅनलाईन बिनलाईन, तृतीय क्रमांक पोपट गायकवाड - पाणी वाचवा जीवन वाचवा, उत्तेजनार्थ सुनील गुडेकर - तंबाखूचे दुष्परिणाम, ममता विचारे - वसुंधरेचे भवितव्य आपल्या हाती यांना गौरविण्यात आले आहे.माध्यमिक विभाग विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक सूरज पालकर, वरदान न्यू इंग्लिश स्कूल, पालपेणे - सौरऊर्जेवर चालणारे धान्य स्वच्छतायंत्र, द्वितीय अनिकेत कुंभार - वीज बचतीची अफलातून कल्पना माध्यमिक विद्यालय, आबलोली, प्रथमेश गुरव - अंध व अपंगांसाठी रिमोट, न्यू इंग्लिश स्कूल, वेळणेश्वर, उत्तेजनार्थ रोहित भरणकर व सूरज गारिवले यांना नंबर देण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे अध्यापक निर्मिती शैक्षणिक साहित्यामध्ये प्रथम क्रमांक दत्तात्रय निंभोरे - दर्जेदार जीवनासाठी गणित, एस. टी. गाडवे - प्रकाशीय उपकरण, व्ही. एम. लादे - गणितीय बहुउद्देशिय फलक, उत्तेजनार्थ इक्बाल मोहम्मद - अ‍ॅसिड रेन, एम. एस. आंबोडोरे, पालशेत हायस्कूल, तर अध्यापक निर्मित लोकसंख्या शिक्षण साहित्यामध्ये प्रथम क्रमांक व्ही. एस. लादे, पी. एस. व्हनमाने, सुनील मिटकरी, तर उत्तेजनार्थ ए. एस. आग्रे यांना पुरस्कार देण्यात आला. प्रयोगशाळा सहायक निर्मित शैक्षणिक साहित्यमध्ये प्रथम डी. आर. मोहिते, द्वितीय एस. बी. पांचाळ यांचा गौरव करण्यात आला.
विज्ञान नाट्य प्रकारात प्रथम - निसर्गापुढे काहीही नाही. जामसूद हायस्कूल, द्वितीय मामी वाचवा - गुहागर हायस्कूल, पर्यावरण रक्षण - हेदवी हायस्कूल, उत्तेजनार्थ वृक्षवल्ली आम्हा सोयरी, न्यू इंग्लिश स्कूल, पाटपन्हाळे, प्रश्नमंजुषा प्रथम क्रमांक माध्यमिक विद्यालय, कुडली, द्वितीय महात्मा फुले माध्यमिक विद्यालय, पाचेरी आगर, तृतीय शृंगारी उर्दू हायस्कूल, तर उत्तेजनार्थ म्हणून सरस्वती विद्यामंदिर, जामसूद यांचा गौरव करण्यात आला. (वार्ताहर)

Web Title: First of all, there is nothing in front of 'Jijesud' in science drama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.