शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

पहिली प्रवेशासाठी आता ६ वर्षांची अट, शालेय शिक्षण विभागाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 17:31 IST

मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार बालकाचे वय ६ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश द्यावा, असा आदेश राज्य सरकारच्या प्राथमिक शिक्षण विभागाने काढला आहे. त्यामुळे आता सहा वर्षांच्या आतील बालकांना इयत्ता पहिलीत प्रवेश देता येणार नाही, त्याची अंमलबजावणी जिल्ह्यातील प्राथमिक शाळांनी करण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देपहिली प्रवेशासाठी आता ६ वर्षांची अट, शालेय शिक्षण विभागाचे आदेशप्राथमिक शाळांकडून अंमलबजावणी सुरु

रत्नागिरी : मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार बालकाचे वय ६ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश द्यावा, असा आदेश राज्य सरकारच्या प्राथमिक शिक्षण विभागाने काढला आहे. त्यामुळे आता सहा वर्षांच्या आतील बालकांना इयत्ता पहिलीत प्रवेश देता येणार नाही, त्याची अंमलबजावणी जिल्ह्यातील प्राथमिक शाळांनी करण्यास सुरुवात केली आहे.सध्या शहरे तसेच ग्रामीण भागामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळा मोठ्या संख्येने सुरु झाल्या आहेत. अशा शाळांमध्ये मुलांना प्ले ग्रुपपासून प्रवेश दिला जातो. आपल्या मुलांना शाळेत बसण्याची सवय लागावी, यासाठी पालक अडीच ते तीन वर्षे झाल्यानंतर प्ले ग्रुपला दाखल करतात.

सद्यस्थितीत पहिलीपूर्व शिक्षण देणाऱ्या शाळांना परवानगी घेण्याची सक्ती नसल्याने त्यावर शिक्षण विभागाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी प्ले गु्रप, ज्युनिअर केजी आणि सिनियर केजीचे शिक्षण देणाऱ्या शाळांची, संस्थांची दुकानदारी सुरू आहे.सन २०१६ - १७साठी पूर्व प्राथमिक प्रवेशासाठी किमान वय ३ वर्षांहून अधिक व पहिलीसाठी ५ वर्षे पूर्ण असे करण्यात आले होते. याचबरोबर पहिलीच्या प्रवेशासाठी पाल्याचे वय सन २०१७-१८ साठी ५ वर्षे व ४ महिने पूर्ण, सन २०१८ - १९ साठी ५ वर्षे ८ महिने पूर्ण, तर सन २०१९ - २० पासून पहिली प्रवेशासाठी किमान सहा वर्षे वयाची अट नव्या आदेशाद्वारे लागू केली आहे.

यापुढे प्रवेश देताना सर्व शाळांनी ३० सप्टेंबर हा दिनांक गृहीत धरुन मुलांचे वय निश्चित करावयाचे आहे, असे आदेशात म्हटले आहे. या अटीनुसार आरटीईच्या प्रवेशासाठी वेबसाईटवरही वयोगट अपलोड केला आहे. त्यामुळे आरटीईसाठी सहापेक्षा कमी वय असलेल्या मुलाचा अर्ज अपलोडच होत नाही.प्रत्येक बालक शाळेत जाणे आवश्यकराज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ११ जून २०१० रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ अनुसार ६ वर्षे पूर्ण झालेल्या कोणत्याही बालकास मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही. त्यामुळे ६ वर्षे पूर्ण झालेले प्रत्येक बालक शाळेत जाणे आवश्यक आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रRatnagiriरत्नागिरी