सावर्डेत दुकानांना आग; दहा लाखांचे नुकसान
By Admin | Updated: August 9, 2014 00:33 IST2014-08-08T23:29:41+5:302014-08-09T00:33:32+5:30
शॉर्टसर्किटने आग : तरुणांनी विझविली आग

सावर्डेत दुकानांना आग; दहा लाखांचे नुकसान
सावर्डे : येथील बाजारपेठेतील तीन दुकानांना शॉर्टसर्किटमुळे आग लागून सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. आगीचा भडका उडाल्यानंतर धुराचे प्रचंड लोळ पसरले. काही क्षण हाहाकार माजला. मात्र, अग्निशामक दलाची वाट न पाहता स्थानिक तरुणांनी जिवाची पर्वा न करता आग विझविण्यात यश मिळविले. तसेच दुकानांतील साहित्यही बाहेर काढले. ही घटना आज, शुक्रवारी सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास घडली.
सावर्डे बसस्थानकासमोर प्रिन्स फोटो स्टुडिओतून सकाळी धुराचे लोळ बाहेर येताना स्थानिकांनी पाहिले. तोपर्यंत ही आग शेजारील मोबाईल शॉपी, भैरव गारमेंट्स, अक्सा फूटवेअर या दुकानांपर्यंत पोहोचली. त्यानंतर ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत या आगीत तीन दुकानांतील बहुतांश साहित्य, वस्तू जळून खाक झाल्या होत्या. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात आले. आग प्रथम प्रिन्स स्टुडिओत लागली आणि शेजारील दोन दुकानांना याची झळ बसली. स्टुडिओने पेट घेतल्यावर लगेचच धुराचे लोळ परिसरात पसरले. त्यामुळे ग्रामस्थांनी तेथे तत्काळ धाव घेतली.
ग्रामस्थांपैकी जिजस बालन, नयन कुळ्ये, सूर्यकांत चव्हाण, भूषण देवळेकर, मीना जयस्वार, विनायक चव्हाण, सुनील पवार, राजू गोंंधळेकर, आदींनी जिवाची पर्वा न करता आग विझविण्यासाठी मोलाचे योगदान दिले. ग्रामस्थांनी अग्निशामक यंत्रणेची वाट न पाहता आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या भैरव गारमेंट्स, अक्सा फूटवेअर, सानिया बँगल मार्ट या दुकानातील साहित्य दुकानाबाहेर काढले.राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन प्रिन्स फोटोचे विनोद चव्हाण, भैरव गारमेंट्सचे दिनेश भवरलाल माळी, अक्सा फूटवेअरचे मुस्तफा मेमन यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत केली. दरम्यान, या घटनेचे वृत्त कळताच पालकमंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट .