भरणे मार्गावरील कृषी विभागाच्या नर्सरीला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:19 IST2021-03-30T04:19:21+5:302021-03-30T04:19:21+5:30
khed-photo291 खेड तालुक्यातील भरणे मार्गावर असलेल्या कृषी विभागाच्या नर्सरीला आग लागून नुकसान झाले आहे. लाेकमत न्यूज नेटवर्क खेड : ...

भरणे मार्गावरील कृषी विभागाच्या नर्सरीला आग
khed-photo291 खेड तालुक्यातील भरणे मार्गावर असलेल्या कृषी विभागाच्या नर्सरीला आग लागून नुकसान झाले आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
खेड : तालुक्यातील भरणे मार्गावर असलेल्या कृषी विभागाच्या नर्सरीला साेमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आग लागली. खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या प्रसंगावधनाने ही आग वेळीच नियंत्रणात आणल्यामुळे आंब्याची शेकडो कलमे या आगीपासून बचावली.
भरणे मार्गावर असलेल्या कृषी विभागाच्या नर्सरीला आग लागल्याचे रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांच्या व कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. यावेळी खेडमध्ये कामानिमित्त जाणाऱ्या जितेश कोळी यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या घटनेची माहिती नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना दिली. नगराध्यक्ष खेडेकर यांनी तत्काळ नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी पोहोचण्याचे आदेश दिले. नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाचे कर्मचारी अग्निशमन बंब घेऊन घटनास्थळी पोहोचले आणि भीषण आगीवर नियंत्रण मिळवले. कृषी विभागाच्या या नर्सरीत आंबा, काजू, नारळ, चिकू आदींची मोठ्या प्रमाणात रोपे आहेत. नर्सरीला लागलेल्या आगीच्या धुराने कार्यालयात मार्चअखेर म्हणून सुट्टी असूनही कामकाजात व्यस्त असणाऱ्या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी नर्सरीकडे जाऊन आग विझविण्यासाठी मदत केली.