देवरुख: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथे चंद्रकांत गणू भांबाडे यांच्या काजू फॅक्ट्ररी असलेल्या इमारतीला आग लागल्याची घटना आज, शनिवारी सकाळच्या सुमारास घडली. घटनास्थळी देवरुख नगर पंचायतचा अग्निशमन बंब दाखल होऊन आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले.आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. चंद्रकांत भांबाडे यांच्या काजू फॅक्टरी असलेल्या इमारतीत काजू सोलण्याचे किमती असलेले मशीनरी तसेच काजू बिया व अन्य सामान आगीत जळून खाक झाले आहेत. अग्निशमन बंब दाखल होण्यापूर्वी स्थानिक ग्रामस्थांनी सुद्धा आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. ग्राम महसूल अधिकारी विलास गोलप, संदेश घाग, पोलीस पाटील अनंत (अप्पा )पाध्ये सुद्धा आगीच्या घटनास्थळी होते.
Ratnagiri: धामणीत काजू फॅक्ट्रीला आग; लाखोंचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 11:46 IST