पाच पाेलीस स्थानकांतर्गत साडेपाच लाखांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:33 IST2021-05-11T04:33:26+5:302021-05-11T04:33:26+5:30
रत्नागिरी : संचारबंदीच्या काळात ७ एप्रिल ते ८ मे या कालावधीत रत्नागिरी उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या कार्यक्षेत्रातील ...

पाच पाेलीस स्थानकांतर्गत साडेपाच लाखांचा दंड वसूल
रत्नागिरी : संचारबंदीच्या काळात ७ एप्रिल ते ८ मे या कालावधीत रत्नागिरी उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या कार्यक्षेत्रातील ५ पोलीस स्थानकात धडक मोहीम राबविण्यात आली. या माेहिमेंतर्गंत ५,५४,५०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे़
उपविभागीय पाेलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या कार्यक्षेत्रात रत्नागिरी शहर, रत्नागिरी ग्रामीण, पूर्णगड, जयगड व संगमेश्वर अशी पाच पाेलीस स्थानके येतात़. या पाेलीस स्थानकांतर्गत संचारबंदीच्या काळात कडक बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता. त्याचबराेबर, विनाकारण फिरणाऱ्यांविराेधात कडक कारवाई करण्यात आली. पाच पाेलीस ठाण्यांतर्गत ४२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तसेच विनामास्क फिरणाऱ्या ६९३ जणांकडून ३,४७,५०० रुपयांचा दंड आकारला आहे. आस्थापनेच्या १५३ केसेसमधून २,०७,००० रुपये इतका दंड वसूल केला आहे. मोटार वाहन कायदा अंतर्गत २,८८२ दंडात्मक कारवाई केली. ही कारवाई यापुढे अशीच सुरू राहणार असल्याचे वाघमारे यांनी सांगितले.
अति अत्यावश्यक असेल, तरच घराबाहेर पडा, असे आवाहन सदाशिव वाघमारे यांनी केले आहे. अत्यावश्यक सेवेतील लोकांनीही शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालनच करून घराबाहेर पडावे. तसे न करता आढळले, तर त्यांच्यावरही कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
---------------------------
रत्नागिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी नाकाबंदीच्या ठिकाणी वाहनांची तपासणी केली. (छाया : तन्मय दाते)