अखेर लांजात रखडलेल्या महामार्गाच्या कामाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:35 IST2021-05-25T04:35:49+5:302021-05-25T04:35:49+5:30
लांजा : भाजपचे प्रदेश सचिव आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी दिलेल्या ३० मेपर्यंत काम पूर्ण करण्याच्या अल्टिमेटमनंतर अखेर ...

अखेर लांजात रखडलेल्या महामार्गाच्या कामाला सुरुवात
लांजा : भाजपचे प्रदेश सचिव आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी दिलेल्या ३० मेपर्यंत काम पूर्ण करण्याच्या अल्टिमेटमनंतर अखेर मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या लांजा शहरातील कामाला सुरुवात झाली आहे. ३० मेपर्यंत काम पूर्ण न झाल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा थेट इशारा त्यावेळी राणेंनी दिला होता़
तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी नीलेश राणे रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. यादरम्यान ते लांजा येथे आले असता, लांजा शहरातील नागरिकांनी मुंबई-गोवा महामार्गाबाबत नाराजी व्यक्त केली होती. रखडलेल्या कामामुळे लांजा शहरातील नागरिक, व्यापारी आणि वाहनचालक यांना प्रचंड गैरसोय होत होती. ही बाब लक्षात आल्यानंतर नीलेश राणे यांनी लांजातील रखडलेले काम ३० मेपर्यंत दिवस रात्र
मेहनत करून महामार्गाच्या दोन्ही बाजूचे काम पूर्ण करा. हे काम पूर्ण न झाल्यास आपण पुन्हा लांजा येथे येऊ, असे राणे यांनी कंपनीच्या अधिकारी शितलानी यांना सांगितले हाेते़
नीलेश राणे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर सोमवारपासून मुंबई - गोवा महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे. लांजा कुक्कुटपालन येथून ते लांजा शासकीय विश्रामगृह येथील साई समर्थ ढाबा या अंतरादरम्यान संपूर्ण रस्त्याचे कामे केले जाणार आहे. त्यामध्ये लांजा शहरात महामार्गाचे
काम हे दुतर्फा काम केले जाणार असल्याची माहिती संबंधित ठेकेदारामार्फत देण्यात आली.
----------------------
लांजा शहरातील रखडलेले चाैपदरीकरणाचे काम साेमवारपासून पुन्हा सुरू करण्यात आले़