शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

अखेर रमेश कदम काँग्रेसमध्ये-प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत मुंबईत कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 10:14 PM

चिपळूण : आठ महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांनी सहकाºयांसह बुधवारी मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

चिपळूण : आठ महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांनी सहकाºयांसह बुधवारी मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजपने कोणतीही जबाबदारी न दिल्याने कदम यांनी पक्षास सोडचिठ्ठी देणार असल्याची नाराजी महिन्यांपूर्वी व्यक्त केली होती.मुंबई येथील टिळक भवन या काँग्रेसच्या मुख्यालयात पार पडलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार हुसेन दलवाई, आमदार व काँग्रेसचे प्रवक्ते भाई जगताप, माजी आमदार माणिक जगताप, जिल्हा प्रभारी विश्वनाथ पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी रमेश कदम यांनी आपण वयाच्या १८ व्या वर्षांपासून काँग्रेसमध्ये तळागाळात काम केले आहे. पुन्हा एकदा आपण काँग्रेसमध्ये काम करीत असताना कोकणात काँग्रेसला चांगले दिवस आणू. आपल्यावर पक्षाने जो विश्वास दाखविला आहे तो सार्थ करण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले. यावेळी रमेश कदम यांचे शेकडो समर्थक उपस्थित होते.यांनी केला पक्ष प्रवेशसिंधुदुर्गचे वसंत केसरकर यांनीही काँगे्रसमध्ये प्रवेश केला. रमेश कदम यांच्याबरोबर माजी नगराध्यक्ष अजमल पटेल, माजी नगरसेवक रमेश खळे, पांडुरंग भैरवकर, हारुणभाई कच्छी, राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष श्रीकृष्ण खेडेकर, हिंदुराव पवार, दीपक कदम, आदी निवडक सहकाºयांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.आता स्वबळावर जिंकू : दलवाईरमेश कदम यांच्या प्रवेशामुळे रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेस मजबूत होईल. वसंत केसरकर, पुष्पसेन सावंत यांच्या प्रवेशामुळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काँग्रेस मजबूत होईल व पुढच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर जिंकू शकेल, असा विश्वास खासदार हुसेन दलवाई यांनी व्यक्त केला.जातीवादी संघटनांना आळा बसेलकोकणात जातीयवादी संघटनांना माजी आमदार रमेश कदम यांच्या प्रवेशामुळे आळा बसेल. आता सर्व बांधवांनी एकत्र येऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करावा. काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी उभी राहील, असे अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष हनिफ कुरेशी यांनी सांगितले.कोकणात काँग्रेस मजबूत होईलमाजी आमदार रमेश कदम यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे चांगला निर्णय होतोय. एक लढवय्या, अभ्यासू नेता काँग्रेसमध्ये येत असल्याने कोकणात काँग्रेस अधिक मजबूत होईल. आपण विधिमंडळात त्यांच्याबरोबर काम केले असल्याने त्यांच्या कामाची पद्धत आपल्याला माहीत आहे, असे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार माणिक जगताप यांनी सांगितले.कार्यकर्ते, पदाधिकारी समाधानीजिल्हा परिषदेचे माजी सदस्य नंदकिशोर थरवळ, काँग्रेसचे प्रवक्ते इब्राहिम दलवाई, माजी सरपंच वासुदेव मेस्त्री, काँग्रेसचे प्रवक्ते अशोक कदम, महिला प्रदेश सदस्या सावंत, राष्ट्रवादीचे माजी खजिनदार रोशन दलवाई यांनीही रमेश कदम यांच्या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केले असून, रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेस बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

रमेश कदम यांच्या रूपाने काँग्रेसला चांगले नेतृत्व मिळाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आम्हाला नेतृत्वाचा अभाव जाणवत होता. ती कसर आता कदम यांच्यामुळे भरून निघाली आहे. कोकणात पूर्वी काँग्रेस प्रबळ होती. कदम यांच्या प्रवेशामुळे पुन्हा एकदा कोकणात काँग्रेसला वैभवाचे दिवस येतील.- अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस