शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

..अखेर आश्वासनानंतर आंबा बागायतदारांचे आमरण उपोषण मागे 

By मेहरून नाकाडे | Updated: December 16, 2023 18:58 IST

माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी आंदोलकांशी थेट संवाद साधत आंदोलन मागे घेण्याचे केले आवाहन

रत्नागिरी: आंबा,काजू बागायतदरांचे कर्जमाफीसाठी सुरु असलेल्या आमरण उपोषणाकडे स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केले असले तरी माजी आमदार बाळ माने, जि.प.चे माजी अध्यक्ष उदय बने, माजी सभापती परशुराम कदम यांनी पुढाकर घेत मंत्र्यांच्या माध्यमातून मागण्या मान्य करुन घेवू असे आश्वासन दिले. आमरण उपोषणाला बसलेल्या शेतकरी रामचंद्र मोहिते यांना बाळ माने, उदय बने यांनी सरबत देवून उपोषण थांबविले.गेल्या सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुख्य रस्त्यावर आंबा, काजू बागायतदारांचे हे आंदोलन सुरू होते. करबुडे येथील आंबा बागायतदार शेतकरी रामचंद्र मोहिते आमरण उपोषणास बसले होते. इतर बागायतदारांनी आंदोलनास पाठीबा देण्यासाठी साखळी उपोषण सुरू ठेवले होते. उपोषणाच्या माध्यमातून बागायतदारांची रास्त मागणी ऐकून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे अधिकारी येतील अशी अपेक्षा होती. परंतु गेल्या आठवडाभरात आंदोलनकर्त्यां बागायतदारांची बाजू कुणीही ऐकून घेण्यास पुढे सरसावलेले नव्हते. शनिवारी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी आंदोलकांशी थेट संवाद साधत विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांच्या माध्यामातून आंबा, काजू बागायतदारांच्या प्रश्न सोमवारी विधानसभेत आवाज उठवला जाईल, तुम्ही आंदोलन मागे घ्या असे आवाहन केल्यानंतरच आंदोलकांचे नेते प्रकाश साळवी यांनी आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली. यावेळी माजी सभापती परशुराम कदम, बागायतदार संघटनेचे प्रकाश साळवी, तुकाराम घवाळी, नंदकुमार मोहिते, मंगेश साळवी उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबाFarmerशेतकरीagitationआंदोलन