निवेबुद्रुक येथे दारू विक्रीप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:36 IST2021-08-20T04:36:53+5:302021-08-20T04:36:53+5:30
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील निवेबुद्रुक सरोदेवाडी येथे देवरूख पोलिसांनी १ हजार ५०० रुपये किमतीची ३० लीटर गावठी हातभट्टीची दारू ...

निवेबुद्रुक येथे दारू विक्रीप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील निवेबुद्रुक सरोदेवाडी येथे देवरूख पोलिसांनी १ हजार ५०० रुपये किमतीची ३० लीटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली आहे. ही कारवाई बुधवारी करण्यात आली. याप्रकरणी प्रवीण अंकुश शिंदे या तरुणावर देवरूख पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग रत्नागिरीचे अरुण चाळके यांनी फिर्याद दिली आहे. प्रवीण शिंदे हा बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास गावठी हातभट्टीची दारू बिगरपरवाना विक्री करताना आढळला. त्याच्याकडून गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आले आहे. प्रवीण शिंदे यांच्यावर देवरुख पोलीस स्थानकात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल जावेद तडवी करीत आहेत.